एचडीएफसी बँक ६०००० कोटी रुपये डेट्स इन्स्ट्रूमेंटमार्फत उभारणार

22 Apr 2024 15:29:54

HDFC Bank
 
 
मुंबई: एचडीएफसी बँकेने डेट इन्स्ट्रूमेंटेमार्फत ६०००० कोटींचा निधी उभारण्याचे ठरवले असल्याचे वृत्त वृत्तसंस्थांनी दिले आहे. बँकेने संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.बँकेने दीर्घकालीन बाँड नवीन मूलभूत सुविधा व परवडणारी घरे बांधण्यासाठी लागणारा वित्त पुरवठा करण्यासाठी ही निधी उभारणी केल्याचे बँकेने सांगितले आहे.
 
टीयर १, २ या भागात घर उभारणीसाठी लागणारे कर्ज पुरवठा करण्याकरिता एचडीएफसी बँक या बाँडचे अनावरण करणार आहे.खाजगी माध्यमातून हे बाँडचे अनावरण करण्यात येणार आहेत.पुढील १२ महिन्यांसाठी हे इश्यू केले जातील.यासंबंधीची लागणारी पूर्वतयारी करताना बँकेचे भागभांडवलधारकांची परवानगी या इश्यूसाठी घेण्यात येणार आहे.
 
परवाच एचडीएफसी बँकेने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला होता.बँकेच्या निव्वळ नफ्यात ३७ टक्क्यांनी भर पडत निव्वळ नफा १६५१२ कोटींवर पोहोचला होता.बँकेने प्रति समभाग १९.५० रूपयांचा लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. १९ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या समभागात २.४६ टक्क्यांनी वाढ झाली होती.
 
Powered By Sangraha 9.0