मोठी बातमी: रिलायन्स जिओचा तिमाही निकाल जाहीर कंपनीला ५३३७ कोटींचा निव्वळ नफा

22 Apr 2024 18:53:23

Jio
 
 
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Reliance Jio Infocomm) ने आपला चौथा तिमाही निकाल जाहीर केला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला १३.२ टक्क्यांनी निव्वळ नफा वाढत एकूण ५३३७ कोटी प्राप्त झाला आहे.मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ४७१६ कोटी नफा झाला होता.
 
कंपनीच्या एकूण महसूलातही मार्च तिमाहीत १०.९६ टक्यांने वाढ झाली होती. कंपनीचा एकूण महसूल २५९५९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे महसूल २३३९४ कोटीवर पोहोचले होते. कंपनीच्या खर्चातही थोडी वाढ झाली आहे.इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या खर्चात १०.२ टक्क्यांनी वाढ होत खर्च १८९१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत खर्च १७१७२ कोटीवर एकूण खर्च गेला होता.
 
कंपनीच्या निव्वळ नफ्यात २.४७ टक्क्यांनी या आर्थिक वर्षात वाढ होत मागील तिमाहीत नफा ५२०८ कोटींवर पोहोचला होता. कंपनीच्या कामकाजातून महसूलात २.३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या तिमाहीत हे उत्पन्न महसूल २५३६८ कोटी रुपयांवर पोहोचले होते. एकत्रित उत्पन्नात मागील वर्षाच्या ९१३७३ कोटीवरून वाढ होत एकत्रित उत्पन्न १००८९१ कोटींवर पोहोचले आहे.
 
कंपनीच्या EBITDA (कर व इतर खर्चाआधी नफा) ११.४८ टक्क्याने वाढत १३६१२ कोटीवर निव्वळ नफा पोहोचला आहे. मागील वर्षांच्या तिमाहीत हा नफा १२२१० कोटींवर होता. तज्ञांनी एआरपीयु (Average Revenue Per User) १८१ ते १८४ रुपये राहिल असा अंदाज व्यक्त केला होता.मागिल वर्षी हा आकडा १८७.८ रुपये तर मागील तिमाहीत हा आकडा १८१.७८ रुपये होता. रिलायन्स जिओ ही सर्वाधिक सबस्क्राईबर असलेली भारतातील क्रमांक एकची कंपनी आहे. आज शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज समभागात ०.७७ टक्क्यांनी वाढ झाली होती.
 
Powered By Sangraha 9.0