सावधान! निवडणूकपूर्व संशयास्पद डिजिटल व्यवहार सरकारच्या रडारवर

22 Apr 2024 12:59:33

RBI
 
 
मुंबई: काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने कंबर कसली असतानाच निवडणूक काळात सरकारने मिशन काळा पैसा हाती घेतले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फिनटेक पेमेंट कंपन्यांना व विना बँकिंग प्रणाली ऑपरेटरस (PSOs) ला लोकसभा निवडणुक काळात संशयास्पद व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,आँनलाईन व इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणालीत बारकाईने नजर राखत मतदानावर परिणाम करणारा व मतदारांना पैशाने भूलवणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
 
पेमेंट रेग्युलेटर कंपन्यांची निवडणूक काळातील संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर असणार आहे. मोठ्यामोठ्या रकमा आदान प्रदान होत असलेल्या व्यवहारांवर आता यंत्रणाचे लक्ष असणार आहे. फिनटेक कंपन्या राझोरपे,कॅशफ्री,सीसी अव्हेन्यू, एमएसडब्लूआयपीई (Mswipe) ही मुख्य पेमेंट एग्रिगेटर कंपन्या आहेत.निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाद्वारे हा निर्णय घेण्यात येणार आहे. कुठलाही संशयास्पद व्यवहार घडल्यास त्यावर यंत्रणेकडून कारवाई करण्यात येणार आहे.
 
पहिल्यांदाच सरकारने हे आदेश दिले आहेत.यापूर्वी निवडणूकीतील काळात काळा पैसा रोख रकमेच्या स्वरूपात आदान प्रदान केल्याच्या घटना घडल्या होत्या.परंतु तंत्रज्ञानाच्या मार्फत होणारा भष्टाचार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आरबीआयने घेतला आहे.
 
Powered By Sangraha 9.0