मुंबई : मुंबईतील भाजप कार्यांलयाला आग लागली आहे. मुंबईतील नरिमन पाँइंट येथील भाजप कार्यांलयाच्या किचनमध्ये वेल्डींगचे काम सुरु असताना अचानकपणे आग लागली. घटनास्थळी दोन अग्मिशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रदेश कार्यालयात लाकडी आणि पीओपीचं सामान आहे, तिथे आगीचा भडका उडाला आहे.
रविवारचा दिवस असल्याने याठीकाणी कोणतेही पदाधिकारी उपस्थित नव्हते. फक्त सोशल मिडीया संदर्भात काम करणारे काही कर्मचारीच यावेळी उपस्थित होते. या आगीत कोणालाही इजा झालेली नाही. पण कार्यलयाचे बरेच नुकसान झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नरिमन पॉईंट भागात हे प्रदेश कार्यालय आहे. या कार्यलयातून राज्यभरातील भाजपा संघटनेचे काम पाहिले जाते. भाजपच्या बैठका आणि पत्रकार परिषदा याच कार्यालयात होत असतात.
भाजप नेते प्रसाद लाड आणि राहुल नार्वेकर हे घटनास्थळी पोहेचले आहेत. आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. सर्व कर्मचारी सुखरुप आहेत. आग जवळपास आटोक्यात आहे. मालमत्तेचं किती नुकसान झालं आहे. ते लवकरच कळेल असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.