येस बँकेचे संस्थापक राणा कपूर चार वर्षांनी तुरूंगाबाहेर

मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात कपूर यांना जामीन मंजूर

    20-Apr-2024
Total Views |

Rana Kapoor
 
मुंबई: येस बँक (Yes Bank) संस्थापक राणा कपूर यांची अखेर चार वर्षांनी सुटका शुक्रवारी करण्यात आली आहे. कर्ज घोटाळा प्रकरणात अखेर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.२०२० मध्ये कपूर यांना मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक करण्यात आली होती. येस बँकेतील घोटाळ्या प्रकरणी ईडी व सीबीआय या चौकशी यंत्रणेने त्यांच्यावर आठ गुन्हे दाखल केले होते.
 
अद्याप काही प्रकरणात सुनावणी सुरू होणे बाकी असताना त्यांना तळोजा कारागृहातून आज मुक्त करण्यात आले आहे. याआधी वेगवेगळ्या केसमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला होता. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर करत 'काही प्रकरणात त्यांची सुनावणी बाकी 'असल्याने त्यांच्या कोठडीची तूर्तास गरज नसल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. अजून या जामीनाबदल कारण काय याचा उलगडा अजून झालेला नाही.
 
सीबीआयने यापूर्वी कपूर यांच्यावर गुन्हा नोंदवताना कर्ज देण्यासाठी घराच्या स्वरूपात कवडीमोल भावाने लाच मागितल्याचे न्यायालयात सांगितले होते. अनंथा रिअल्टी लिमिटेड या कंपनीने बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आपली संपत्ती गहाण ठेवली होती. ही मालमत्ता ३७८ कोटी रुपयांना मिळाली होती जी बाजारात मूळ किंमत ६८५ कोटी रुपये होती. ही कंपनी कपूर यांनी आपली कंपनी Bliss Abode Private limited या कंपनीच्या माध्यमातून बायको बिंदू कपूर यांच्या नावाने खरेदी केली होती.
 
याआधी येस बँकेने Avantha Group या कंपनीला २५०० कोटी रुपयांचे कर्ज देऊन वाढीव ४०० कोटींचे अतिरिक्त कर्ज देऊ केले होते असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.मात्र तूर्तास सीबीआयने आरोपपत्रानुसार आपल्या चार्जशीटमध्ये कपूर यांचा घोटाळ्यात काय सहभाग होता हे निर्दशनास येत असल्यामुळे न्यायाधीशांनी हा त्यांना जामीन मंजूर केला आहे.