लॉरेन्स बिश्नोईची कॅब पोहोचली सलमानच्या घरी, कॅब चालक पोलिसांच्या ताब्यात

    20-Apr-2024
Total Views |

salman khan  
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी दोन इसमांकडून गोळीबार करण्यात आला होता. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी गुजरातमधील भूज मधून ताब्यात घेतले आहे. तसेच, या प्रकरणासंबंधी आणखी एक बातमी समोर आली आहे. आता एका टॅक्सी चालकाने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर जाऊन लॉरेन्स बिश्नोई कोण आहे, अशी विचारणा केली असता त्याला देखील तात्काळ वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
 
 
तर झालं असं की, गाझियाबादमधील एका अज्ञात माणसाने कॅब बुक केली होती. त्यानुसार कॅब बुक करणाऱ्या २० वर्षीय रोहित त्यागीला अटक करण्यात आली आहे. त्याची गाडी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं अभिनेता सलमान खानच्या निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्पासून वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत बुक करण्यात आली होती. सध्या रोहित याला दोन दिवसीय पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.