घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, खरं कारण आलं समोर

    20-Apr-2024
Total Views |

salman khan 
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात गोळीबार केलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. याशिवाय एका कॅब चालकाला देखील ताब्यात घेतले आहे. एकीकडे पोलिसांचा या प्रकरणासंबंधी तपास सुरु असताना दुसरीकडे सलमान (Salman Khan) मुंबई बाहेर थेट दुबईला गेला आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणानंतर सलमान खान सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असं म्हटलं जात असताना सलमान थेट दुबईत पोहोचला आहे.
 

salman khan 
 
दरम्यान, त्याच्याच Being Strong या ब्रॅंड लॉंचसाठी दुबईत गेल्याचे समोर आले आहे. १४ एप्रिल रोजी घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान पाच दिवस घरीच होता. १९ एप्रिलला तो सुरक्षा रक्षकांसह मुंबई विमानतळावरून थेट दुबईला रवाना झाला असून पुढील काही दिवस तो दुबईत असेल असे म्हटले जात आहे.