Q4 Results: एचडीएफसी बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेला १६५११ कोटींचा रुपयांचा नफा !

बँकेच्या एनपीएतदेखील १.२६ टक्क्यांवरून १.२४ टक्क्यांवर घट

    20-Apr-2024
Total Views |

HDFC Bank
 
 
मुंबई: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळख असणाऱ्या एचडीएफसी बँकेने आपला चौथा तिमाही निकाल जाहीर केला. बँकेला आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील जानेवारी ते मार्च तिमाहीत १६५११ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तज्ञांच्या मते हा नफा १६५७६ कोटींवर अपेक्षित होता. त्यानुसार जवळपास भाकीत खरे ठरले असून कंपनीला १६३७३ कोटींचा नफा झाला आहे.
 
कंपनीचे एकूण निव्वळ व्याज उत्पन्न (NII) २९००७ कोटीवर पोहोचले आहे. मागील वर्षाच्या २८४७० कोटींच्या तुलनेत निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीच्या एनपीएत (Non Performing Assets) मागील तिमाहीतील १.२६ टक्क्यांवरून घसरत १.२४ टक्क्यांवर पोहोचत एनपीए २९१७२ कोटींवर पोहोचला आहे.
 
मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ तिमाहीतील ३४५.५ अब्ज रुपयांवरून १२२.६ टक्क्यांनी वाढत आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील तिमाहीत ८०७ अब्ज रुपयांवर पोहोचले आहे. मार्च ३१, २०२४ पर्यंत करोत्तर नफा (Profit After Tax) आर्थिक वर्ष २०२३ मधील १७६.२ अब्ज रुपये झाला आहे.
 
बँकेच्या किरकोळ कर्ज वाटपात मोठी वाढ झाली आहे. ३१ मार्च २२०४ पर्यंत बँकेच्या किरकोळ कर्ज वाटपात मागील वर्षाच्या १०८.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेच्या मुदतठेवीत आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील २६.४ टक्क्याने वाढ होत २३७९८ कोटीवर मुदतठेव पोहोचली आहे. बँकेची मुदतठेव आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील चौथ्या तिमाहीत २३.७ लाख कोटी होती. तिसऱ्या तिमाहीत बँकेची मुदतठेव १८.८ लाख कोटी होती
 
एचडीएफसी बँकेने आपल्या गुंतवणूकदारांसाठी संचालक मंडळाच्या बैठकीत १९.५० रुपये प्रति समभाग (Dividend) जाहीर केला आहे. याबाबत भागभांडवल धारकांच्या परवानगीनंतर लाभांशाबाबत अंतिम पाऊल उचलले जाऊन शकते. बँकेचे एकूण बाजारी भांडवल (Market Capitalisation) ११६३३१५ कोटींवर पोहोचले आहे.