‘पुष्पा २’च्या ६ मिनिटांच्या प्रसंगासाठी खर्च केले तब्बल ६० कोटी

    20-Apr-2024
Total Views |

pushpa 2 
 
 
मुंबई : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा १’ आणि ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. पहिल्या भागाच्या अप्रतिम यशानंतर दुसरा भाग कधी येणार याची चाहते वाट पाहात असतानाच ‘पुष्पा २’ (Pushpa 2) ची घोषणा झाली. यानंतर अल्लू अर्जूनचा थक्क करणारा पहिला लूक समोर आला होता. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक अवाक् करणारी बातमी समोर आली आहे. या चित्रपटातील प्रसंगांसाठी चक्क ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
 
अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या पुष्पा २ या चित्रपटात गंगम्मा जत्रा आण एक फायटींग प्रसंग आहे. दोन्ही प्रसंग मिळून एकूण ६ मिनिटांच्या या सीनसाठी तब्बल ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. तसेच, हा प्रसंग चित्रित करण्यासाठी तब्बल ३० दिवस लागले होते असेही सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, काही दिवसांपुर्वी ‘पुष्पा २’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून यात हातात त्रिशूळ, गुलाल अशा खास लूकमध्ये अल्लू अर्जुनची झलक समोर आली आहे. इतकंच नाही तर पुष्पा पायात घुंगरु बांधून, चापून चोपून साडी नेसून गुंडांना लोळवताना दिसतोय. यातून त्याची दहशत दिसून येत आहे. केवळ पुष्पा म्हणजे अल्लू अर्जूनच नाही तर श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना देखील ‘पुष्पा २’ मध्ये भन्नाट अवतारात दिसत आहे.
 
'पुष्पा २' चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना पुष्पा आणि श्रीवल्लीची सुपरहिट कॅमिस्ट्री पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे.