'कॅप्टन अमेरिका'चे स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात, ‘वॉर २’मध्ये ह्रतिक-एनटीआरला देणार ट्रेनिंग

20 Apr 2024 17:44:35
hrithik  
 
 
मुंबई : अभिनेता ह्रतिक रोशन आणि दाक्षिणात्य स्टार ज्यु. एनटीआर लवकरच यशराजच्या चित्रपटात झळकणार आहेत. हिंदी चित्रपटातील अॅक्शनपटही हॉलिवूडच्या तोडीस तोड असावा म्हणून यशराज फिल्मसचा विशेष हट्ट आहे. यशराज फिल्मसच्या युनिर्व्हसल स्पाय सीरिजमधील 'वॉर-२' (War 2) साठी आता हॉलिवूडचे नावाजलेले अॅक्शन डायरेक्टर स्पिरो रजाटोस काम करणार आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन (War 2) आणि ज्युनिअर एनटीआर (War 2) एकत्रित दिसणार आहेत.
 
य़शराजच्या स्पाय युनिर्व्हसचे एकामागून एक मोठे चित्रपट येत आहेत. २०२३ मध्ये आलेल्या 'पठाण' आणि 'टायगर ३'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आणि आता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'वॉर'या चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
स्टंट डायरेक्टर स्पिरो रजाटोस हे कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर, कॅप्टन अमेरिका: द फर्स्ट सोल्जर, फास्ट एक्स, एफ-९ द फास्ट सागा यांसारख्या ब्लॉकबस्टर अॅक्शन चित्रपटातील स्टंटसाठी सुप्रसिद्ध आहेत. वॉर २ चे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार असून अॅक्शनपटाचा नवा अनुभव प्रेक्षकांना २०२५ मध्ये मिळणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0