Dailyhunt कंपनीने Magzter कंपनीचे अधिग्रहण केले

ग्राहकांसाठी सबस्क्रिप्शन योजना आणणार

    20-Apr-2024
Total Views |

Verse
 
मुंबई: बंगलोरस्थित लोकप्रिय न्यूज एग्रीगेटर Dailyhunt ची मुख्य कंपनी VerSeInnovation कंपनीने डिजिटल न्यूज स्टँड Magzter कंपनीचे अधिग्रहण (Acquisition) केले आहे. कंपनीने याबाबत अधिक माहिती दिली नसली तरी कंपनीने आपल्या जाहिराती व्यासपीठाबरोबरच अधिक महसूल निर्मितीसाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
 
Magzter आपल्या बातम्या व मासिकांच्या एकत्रित व्यासपीठासाठी प्रसिद्ध असून कंपनी ग्राहकांना सबस्क्रिप्शनबेस सेवा पुरवते. अधिग्रहण नेमके किती रुपयाने झाले यासंबंधीची माहिती अजून पुढे आलेली नाही. Magzter कंपनी २०११ साली अमेरिकेत स्थापन झाली होती. कंपनीच्या लायब्ररीत सध्या ८५०० हून अधिक मासिक व ६० हून अधिक वर्तमानपत्राचा संचय आहे.
 
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, दोन्ही कंपन्यांमध्ये रोख रक्कम व समभाग अशा दोन्ही स्वरूपाचा व्यवहार झाला असल्याचे कंपनीचे सह संस्थापक उमंग बेदी यांनी म्हटले आहे. याशिवाय Dailyhunt कंपनीने सबस्क्रिप्शन बेस सेवा सुरू केली आहे.यासेवेत Magzter मधील ६० भाषांमधून अधिक भाषेतला कंटेट कंपनीला (जाहिरात - विना) वाचकांना मिळणार आहे.
 
नवीन ऑफरनुसार ग्राहकांना एखाद्या विशेष वृत्तसंस्थेचे अथवा मासिकाचे सबस्क्रिप्शन घ्यायचे असल्यास त्या पद्धतीची सेवाही ग्राहक घेऊ शकतात. अथवा त्यांना नियमित मासिक सबस्क्रिप्शन योजना घेता येऊ शकते. यापूर्वी Magzter ने १३ दशलक्ष डॉलर्सचा निधी व्यवसायासाठी उभा केला असल्याचे Pitchbook ने म्हटले होते. Dailyhunt Premium सेवेत इंग्रजी, फ्रेंच, इटालियन जापनीज,रशियन,व इतर भाषांतील मासिक व वृत्तपत्र वाचनासाठी उपलब्ध असणार आहेत.
 
याविषयी बोलताना VerSe कंपनीचे उमंग बेदी म्हणाले, 'गेल्या काही वर्षांत, आम्ही स्वतःला एका विशेषाधिकाराच्या स्थितीत शोधतो जेथे आम्ही ३५० दशलक्ष वापरकर्त्यांना सेवा देतो. यासह, आम्ही १५ वेगवेगळ्या स्थानिक भाषांमधील शिक्षित, आणि मोठ्या प्रमाणात संपन्न मध्यमवर्गीय प्रेक्षकांना सेवा देतो. VerSe चा महसूल आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५७ टक्क्यांनी वाढून १८०९ कोटी रुपये झाला. गेल्या दोन वर्षांपासून, व्यवसाय म्हणून डेलीहंटचा स्टँडअलोन EBITDA सकारात्मक आहे.'