मोठी बातमी: नॅशनल फर्टिलायझर कंपनीला ' नवरत्न ' कंपनीचा दर्जा

डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राईजने कंपनीला नवरत्न दर्जा प्रदान केल्याची घोषणा

    20-Apr-2024
Total Views |

National Fertiliser
 
 
मुंबई: नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड कंपनीला ' नवरत्न ' कंपनीचा दर्जा मिळाला आहे. यासंबंधी कंपनीने मोठी घोषणा करत डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राईजने कंपनीला नवरत्न दर्जा प्रदान केल्याची घोषणा कंपनीने घोषणापत्रात केलेली आहे.सेबी रेग्युलेशन २०१५, ३० अंतर्गत कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे.
 
नवरत्न कंपन्या म्हणजे काय?
नवरत्न हा सरकारी कंपन्यांचा एक समुह आहे. आर्थिक स्वायत्तता असलेल्या कंपन्या १००० कोटींपर्यंत भागभांडवल उभे करू शकतात.त्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज लागत नाही. नवरत्न कंपन्या हा ९ कंपन्यांचा समुह आहे ज्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असलेल्या कंपन्यांचा समावेश होतो.या कंपन्यांना Central Public Sector Enterprises (CPSE) देखील म्हटले जाते.
 
डिसेंबर तिमाहीत कंपनीला नफा झाला होता. त्यापूर्वी कंपनीला सप्टेंबर तिमाहीत ८७.१० कोटींचे नुकसान झाले.डिसेंबर महिन्यात कंपनीला १५०.९ कोटींचा नफा झाला होता.डिसेंबर पर्यंत कंपनीला ७५८०.९३ कोटींचा नफा झाला होता.