बंगालमध्ये शेख हसनने तोडले मंदिर, पोलिसांची हिंदूंना अरेरावी! व्हिडीओ व्हायरल!

    02-Apr-2024
Total Views |
hindu-woman-durga-roy-narrates-templeनवी दिल्ली :      पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण देशभर गाजले असताना आता पुन्हा एकदा शांतीनिकेतनचा मुद्दा समोर आला आहे. बंगालच्या शांतीनिकेतनमधील एका हिंदू महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून महिलेने दावा केला आहे की टीएमसीच्या गुंडांनी तिचे मंदिर पाडले. तसेच, परिसरातील जमीन बळाकावल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, व्हिडीओतील महिलेचे नाव दुर्गा रॉय असे असून तिने तृणमूल काँग्रेसचा नगरसेवक व इतर काही जणांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी दुर्गा रॉय यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटले की, तृणमूल काँग्रेसचा नगरसेवक पोलिसांसह येथे आली त्यानंतर त्यांनी माझे मंदिर पाडले. मंदिर पाडल्यानंतर स्थानिक पोलिसांनी नगरसेवकाविरुध्द कारवाई करण्याऐवजी मला अटक केली, असे दुर्गा रॉय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


हे वाचलंत का? - सूचना सेठने स्वतःच्या ४ वर्षांच्या मुलाचा केला खून, न्यायालयात ६२४ पानी आरोपपत्रात दाखल!


दुर्गा रॉय म्हणाल्या, “मी संपूर्ण घटना रेकॉर्ड करत असताना त्यांनी माझा फोन घेतला आणि सर्व पुरावे हटविले. त्यानंतर पोलिसांनी मला तुरुंगात टाकले. संध्याकाळी तुरुंगातून सुटून आल्यावर मी आले आणि पाहिले की माझे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे आणि त्यांनी तेथे बेकायदेशीर बांधकामही अशा प्रकारे सुरू केले आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

तृणमूल काँग्रेसचा नगरसेवक शेख हसनने माझे मंदिर तोडले असून पोलिसांनी मला अटक करत मला मारले. दरम्यान, संदेशखाली प्रकरणानंतर आता शांतीनिकेतन येथील प्रकरणानंतर पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. संदेशखाली प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते सहभागी असल्याचा आरोपदेखील करण्यात आला. आता पुन्हा एकदा शांतीनिकेतनमधील घटनेतही तृणमूलच्या नगरसेवकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.