सूचना सेठने स्वतःच्या ४ वर्षांच्या मुलाचा केला खून, न्यायालयात ६२४ पानी आरोपपत्रात दाखल!

    02-Apr-2024
Total Views |
chargesheet-filed-against-suchana-sethनवी दिल्ली :     सूचना सेठ नामक महिलेने गोव्यातील एका हॉटेलमध्ये स्वतःच्या ४ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला आहे. पणजीच्या बाल न्यायालयात सुचना सेठ यांच्याविरोधात ६२४ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात सुचना सेठ यांनीच स्वतःच्या ४ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, दि. ०७ जानेवारी २०२४ रोजी सुचना सेठ नावाच्या महिलेने गोव्यातील एका हॉटेलमध्ये स्वतःच्या ४ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला. आता सुचनाने हे कृत्य केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. तसेच, सदर खून करण्याआधी सूचना हिने तिच्या पतीविरुध्द घरगुती हिंसाचाराचा खटला चालविला होता. महत्त्वाचे म्हणजे हत्येनंतर सुचना सेठला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक करण्यात आली होती.

 
हे वाचलंत का? - मंदिरातील भाविकांना बेशुध्द करण्यासाठी कट्टरपंथीयांनी फेकले मांसाचे तुकडे!


आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून चार्जशीटमध्ये मृत्यूचे कारण गुदमरणे असल्याचे नमूद केले आहे आणि आरोपीला विकृत असे म्हटले आहे. तसेच, मारण्याआधी मुलाला कोणतीही नशा देण्यात आली नसल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या तपासात अनेकवेळा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार तपासात पोलिसांनी एकूण ५९ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत. भारतीय दंडसंहिता कलम ३०२, २०१ व्यतिरिक्त गोवा चिल्ड्रन अॅक्ट २००३ अंतर्गत सुचना सेठवर कारवाई करण्यात आली आहे. चार्जशीटमध्ये म्हटले आहे की, जानेवारी २०२२ मध्ये सुचना सेठने तिचा पती व्यंकटरमण यांना घटस्फोट घ्यायचा असल्याचे सांगितले होते. या संदर्भात बंगळुरू येथील न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. सुचना सेठने याच बंगळुरू न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली होती.