तुम्हीही ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम बाळगत आहात! पहा महिलेसोबत काय घडलं?

    02-Apr-2024
Total Views |
Tamil Nadu Election Officers Action


मुंबई :   
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी उरला असताना निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर असल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून दिसून आले आहे. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तर नेमंक निवडणूक अधिकाऱ्यांनी केलंय तरी काय त्याबाबत जाणून घेऊयात.


 

निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्षांना निवडणुक प्रक्रियेशीसबंधित हालचालींवर बंधन घालण्यात आली आहेत. आता तामिळनाडूत असा एक प्रकार उघडकीस आला आहे. पंजाब येथील एक कुटुंब थेट तामिळनाडूकरिता प्रवास निघाले असताना कुटंबाकडे असलेल्या एकूण ६८,००० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सदर रोकड निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीपूर्वीची आयोगाची कठोर कारवाई असल्याचे समोर आले आहे.
 
 
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सदर कुटुंबीयांची चौकशी करत त्यांच्याकडील ६८ हजारांची रोख जप्त केली. यावेळी कुटुंबातील एक महिला रडताना सुध्दा पाहायला मिळाली परंतु, अधिकाऱ्यांकडून कोणतीही सहानुभूती न दाखविता आपले कर्तव्य बजावत आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर सदर कुटंबीयांची रोख रक्कम परत करण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान होईपर्यंत कृपया कागदपत्रांशिवाय ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख बाळगू नका. कारण पुढील दोन महिन्यांपर्यंत लागू झालेली निवडणूक आचारसंहिता यास कारणीभूत आहे. नाहीतर तुमचीदेखील निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाऊ शकते. तामिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कौतुकास्पद कार्यवाहीमुळे भारतासारख्या प्रगत देशांमध्ये केवळ कायदे कठोर नाहीत, तर त्यांची अंमलबजावणीही सक्षम होत आहे, जे अधिक महत्त्वाचे आहे.