'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटानिमित्त 'गीतरामायण'च्या आठवणींना उजाळा

    02-Apr-2024
Total Views |
१ मे २०२४ रोजी सर्वात मोठा सुरेल बायोपिक अर्थात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ प्रदर्शित होणार
 

sudhir phadke  
 
पुणे : ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Sudhir Phadke) यांची अद्भूत निर्मिती असलेल्या गीतरामायणाला ६९ वर्ष पुर्ण झाली. या दिवसाचे औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Sudhir Phadke) या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लवकरच योगेश देशपांडे दिग्दर्शित स्वरगंधर्व सुधीर फडके हा बाबूजींच्या जीवनावर आधारित चरित्रपट भेटीला येणार आहे.
 
दरम्यान, पुण्यात आयोजित या कार्यक्रमादरम्यान 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाच्या २० फूट उंच अशा भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या पोस्टरवर चित्रपटातील सगळ्या नामांकित व्यक्तिरेखा झळकल्या आहेत. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यावेळी चित्रपटातील 'गीतरामायण'मधील प्रसिद्ध गाणी आणि 'गीतरामायण'च्या प्रवासातील अविस्मरणीय क्षणही दाखवण्यात आले.
 
या कार्यक्रमात 'बाबूजीं'चे व्यक्तिमत्व, त्यांची गाण्याची आवड, गाणी तयार होताना घडलेले प्रसंग, शब्दांचे गीत होतानाच प्रवासही मांडण्यात आला. १ एप्रिल १९५५ रोजी सुरु झालेल्या गीतरामायण शृंखलेचे ७० व्या वर्षात पदार्पण होत असताना, या अजरामर कलाकृतीचा भावपूर्ण, गंधयुक्त आणि सुमधुर आठवणींचा खजिना उलगडण्याचा एक प्रयत्न यावेळी करण्यात आला. एकंदरच 'गीतरामायणा'चा रंजक प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला. 
 
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा सुरेल चरित्रपट १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. य चरित्रपटात अभिनेते सुनील बर्वे यांनी बाबूजींची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या भूमिका असणार आहेत.