कुर्ल्यात येत्या रविवारी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान

    02-Apr-2024
Total Views |

Satchidanand Shevde

मुंबई :
'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा कुर्ला, पश्चिम' यांच्या वतीने यंदा नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून प्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार आणि साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. 'मंदिरे हीच राष्ट्रमंदिरे' या विषयावर ते उपस्थितांना संबोधित करतील. रविवार, दि. ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, न्यू मिल रोड, कुर्ला (प) येथे सदर कार्यक्रम संपन्न होईल. सर्वांना मोठ्या संख्येने व्याख्यान व स्वागत यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.