संदेशखालीत दहशत कायम! गावातील मुली नातेवाईकांकडे आसऱ्याला!

भाजप लोकसभा उमेदवार रेखा पात्रांनी उठवला आवाज

    02-Apr-2024
Total Views |
Sandeshkhali Basheerhat Candidate


कोलकाता :   पश्चिम बंगालच्या बशीरहाटहून भाजपच्या उमेदवार असलेल्या रेखा पात्रांनी त्यांच्या सोबत तृणमुलच्या गुंडांनी केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान काही माध्यमांशी चर्चा करताना बऱ्याच गोष्टी उघड केल्या आहेत. जनसत्ताच्या रिपोर्टनुसार, रेखा पात्रांनी भीषण वास्तव सांगितले आहे. गावातील महिला वर्ग जो त्यांच्या सोबत उभा आहे. या गावातील वातावरण पहाता या त्यांनी आपल्या मुलींना दूरच्या नातेवाईकांकडे पाठविले आहे.

त्यांचे पती हे तृणमुलच्या गुंडांच्या अत्याचाराला कंटाळून तमिळनाडूत मजूरी करण्यासाठी गेले होते. निवडणूक प्रचारात मदतीसाठी ते परतले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना एका अज्ञात ठिकाणी ठेवले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी नातेवाईक-भाजप कार्यकर्ते घरी सदैव तैनात असतात. रेखा यांनी ही निवडणूक भाजपसाठी नव्हे तर स्वतःसाठी लढवून शंभर टक्के स्वतःला राजकारणात झोकून दिले आहे. समर्थकांसह छोट्यातल्या छोट्या गावात जाऊन प्रचार करत आहेत.
यापूर्वी घर चालविण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करण्यासाठी जावे लागत होते. मात्र, घडल्या प्रकारानंतर मनात एक भीती होती की, आता कामं मिळणं बंद तर होणार नाही ना? मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः पाठिशी उभे राहिल्यानंतर आता गावागावातून संदेशखालीतील तृणमुलच्या गुंडांविरोधात लोकांविरोधात लढण्याचे बळ मिळत आहे. गावोगावी प्रचार सुरू असताना जनतेचाही पाठिंबा मिळत आहे. जिथे मंदिर दिसते तिथे थांबून त्या प्रार्थना करतात आणि आशीर्वाद घेऊन त्या पुढे जातात. रेखा म्हणतात, "मी संदेशखालीतून लोकसभेसाठी उभी आहे म्हणजे प्रत्येक त्या पीडित महिलेचे प्रतिनिधीत्व करत आहे. तृणमुल काँग्रेसच्या गुंडांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात लढा म्हणून या माताभगिनी त्यांच्यासोबत उभ्या आहेत.

तृणमुलच्या गुंडांनी केवळ महिलाच नव्हे तर त्यांच्या पती आणि घरातील वडिलधाऱ्यांनाही यातना दिल्यात. रेखा यांच्या पतीलाही मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तमिळनाडूत जाऊन मजूरीचे कामही केले होते. त्यानंतर निवडणूकीच्या प्रचाराच्या कामानिमित्त त्यांना परत यावे लागले होते. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर रेखा संदेशखालीत त्या प्रत्येक पीडितेसोबत संवाद साधत आहेत. त्यांना आशा आहे की, संदेशखालीतील पीडितांचा आवाज त्या संसदेत मांडू शकतील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करत त्यांना हिम्मत दिली होती. रेखा पात्रा यांना ‘शक्ति स्वरूप’ची उपमा दिली होती.