Pondicherry University Controversy : पोलिसांकडून गुन्हा दाखल!

    02-Apr-2024
Total Views |

Pondicherry University

पाँडिचेरी : पाँडिचेरी विद्यापीठातील (Pondicherry University Ramayan) 'एझिनी २०२४' या वार्षिक सांस्कृतिक उत्सवादरम्यान परफॉर्मिंग आर्ट्स विभागाअंतर्गत 'सोमयानम' नावाचे एक नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकाद्वारे सनातन धर्म आणि पूज्य हिंदू देवतांचा अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच निदर्शनास आला. प्रभू श्रीराम, सीता माता आणि भगवान हनुमंतासारख्या हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात तीव्र निदर्शने करत यासंदर्भात निवेदन जारी केले होते. त्यानंतर आता पाँडिचेरी विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांवर ‘धार्मिक भावना दुखावणारे’ नाटक केल्याबद्दल कलापेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


अभाविपने पाँडिचेरी विद्यापीठ परिसरात केलेल्या जोरदार निदर्शनानंतर पोलिसांनी स्वत:हून गुन्हा नोंदवल्याचे स्पष्ट होत आहे. रामायण आणि त्यातील पात्रांच्या पावित्र्याची स्पष्ट अवहेलना हे या महाकाव्याला सर्वोच्च मानणाऱ्या लाखो लोकांच्या श्रद्धेचा अत्यंत आक्षेपार्ह आणि अनादर करणारे आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमधील कम्युनिस्ट आणि डाव्या नेतृत्वाखालील संघटनांनी केलेले सुनियोजित कृत्य आहे. कम्युनिस्ट आणि डाव्या नेतृत्वाच्या संघटनांना जाणूनबुजून प्रभू श्रीरामाची बदनामी करायची होती आणि सीता मातेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे होते. असे अभाविपने आपल्या निवेदनात म्हटले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी सुरू केल्याची माहिती कलापेट पोलिसांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिली.


Pondicherry University

यासोबतच, परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या नाटकाविरुद्ध विद्यापीठाकडे तक्रार प्राप्त झाली असून विद्यापीठानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यासाठी चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून कॅम्पसमध्ये शांतता राखण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांनी केली आहे.