गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी! पटेल रिटेलचा आयपीओ येणार

सेबीकडे आयपीओ करिता पेपर फायलिंग केले

    02-Apr-2024
Total Views | 68

Patel Retail
 
 
मुंबई: प्रसिद्ध सुपर मार्केटचेन पटेल रिटेल या कंपीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. पटेल रिटेलने यासंदर्भात आयपीओ आणण्यासाठी सेबीला विनंती करत आयपीओचे (Initial Public Offer) ची कागदपत्रे सेबीकडे सुपूर्द केली आहेत.
 
हा आयपीओ एकूण ९०.१८ लाख किंमतीचा असणार आहे.यातील १० लाख समभाग ऑफर फॉर सेल (OFS) माध्यमातून १०.०२ लाख समभाग (Shares) प्रमोटर विकणार आहेत. मर्चंट बँकिंग सर्विसेसने सांगितल्याप्रमाणे हा आयपीओ २५० कोटी ते ३२५ कोटी रुपयांचा असू शकतो.
 
ओएफएस हे संस्थापक (Promoters) धानजी पटेल व बेंचर पटेल यांच्या समभागातून हे विकले जाणार आहेत. पात्र कर्मचाऱ्यांसाठी देखील यातील आयपीओ ऑफर करण्यात येणार आहे. ९०.१८ लाख समभाग वगळता बाकीचे समभाग रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुले असतील.
 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयपीओतील केलेल्या निधी संकलनातील ६० कोटींचा वापर थकीत देणी देण्यासाठी होणार आहे ‌तर ११५ कोटी रुपये निधीचा वापर कंपनीच्या वर्किंग कँपिटल गरजेसाठी पूर्ण केला जाईल. बाकी निधीचा वापर कंपनीच्या दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.
 
पटेल रिटेल हे सुपर मार्केटचेन कंपनी असून २००८ साली या कनपनीची स्थापना अंबरनाथ महाराष्ट्र येथे झाली होती. त्यानंतर कंपनीने ठाणे रायगड भागात आपले विस्तारीकरण केले आहे. एफएमसीजी (FMCG ) उत्पादने या सुपर मार्केटमध्ये मिळतात. ३१ डिसेंबर २००३ पर्यंत कंपनीची ३१ सुपर मार्केट आहेत.
 
कंपनीचे उलाढालीतून आर्थिक महसूल आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३३ टक्क्याने वाढून १०१८.५५ कोटींवर पोहोचला होता. करोत्तर नफा (Profit After Tax) ४४ टक्क्याने वाढत १६.३८ कोटींपर्यंत पोहोचला होता. Fedex Securities Private Limited ही संस्था आयपीओसाठी बुकिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121