आपले आचरण हीच आपली ओळख आहे : डॉ. मोहनजी भागवत

    02-Apr-2024
Total Views |

Dr. Mohanji Bhagwat - संग्रहित फोटो

भोपाळ :
"आपले आचरण हीच आपली ओळख आहे. आपल्या मनात, शब्दात आणि कृतीत समन्वय असायला हवा. संपूर्ण जगासोबत एकत्र येण्याची भारताची प्राचीन परंपरा आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. जबलपूर येथे सोमवार, दि. १ एप्रिल रोजी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी रा.स्व.संघाचे अ.भा. कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी देखील उपस्थित होते.

सरसंघचालक यावेळी म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी खूप संघर्ष केला आणि बलिदान दिले. आज आपण मुक्त आहोत. स्वतंत्र राष्ट्रात वक्तशीरपणा, कायद्याची अंमलबजावणी आणि नागरी शिस्त ही देखील एक प्रकारचा देशभक्ती आहे. हे गुण आपल्या आचरणातून आणि संवादातून संपूर्ण समाजात रुजवले पाहिजेत."