'आले रामराज्य भुवरी' - गिरणगावची यंदाची शोभायात्रा ठरणार खास!

    02-Apr-2024
Total Views |

Girangaon Shobhayatra

मुंबई : गुडीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर (Girangaon Shobhayatra) गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान (लालबाग-परळ) यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील भव्य शोभायात्रा आयोजित केली आहे. 'आले रामराज्य भुवरी' ही शोभायात्रेची यंदाची संकल्पना असून प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य मूर्ती विशेष आकर्षण असणार आहे. मंगळवार, ९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वा. या वेळेत शोभायात्रा निघेल. यात्रेचा आरंभ श्रीस्वामी समर्थ मठ, परळ रेल्वे वर्कशॉपपासून होईल, तर यात्रेचा समारोप चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - गिरणगावचा राजा येथे होईल. मराठमोळ्या पोशाखात, वाजतगाजत, जल्लोषात निघणाऱ्या शोभायात्रेसाठी मोठ्या संख्येने सर्वाना शोभायात्रेत सहभागी होऊन गिरणगावची शान वाढवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे वाचलंत का? : सशक्त भारत घडवण्यासाठी सुसंस्कृत समाज घडवण्याची गरज!

प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य मूर्ती (दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, परळ), बाहुबली हनुमान, श्रीराम मंदिर प्रतिकृती (म्हसोबा मंदिर समिती), प्रभू श्रीरामचंद्रांचा चित्ररथ-भगवाधारी महिलांचे पथसंचलन (स्वयंसिद्धा महिला मंडळ, परळ), महिला लेझिम पथक (दुर्गामाता सा.उ. महिला मं. / काळेवाडी महिला मंडळ), मंर्दानी खेळ (पारंपारिक), ढोल पथक (पारंपारिक), भारतमाता पालखी, श्रीराजा शिवछत्रपती चित्ररथ, दुचाकी संचलन या सर्व गोष्टी शोभायात्रेतील खास आकर्षण असेल. अशी माहिती गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान (लालबाग-परळ) चे अध्यक्ष शशिकांत दळवी यांनी दिली. अधिक माहितीसाठी संपर्क - प्रविण राणे (९७७३६६१२९३), विजयकुमार मिश्रा (९९३०२९८७८७), सुनिल चुडनाईक (९७७३२७१८७८)