बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला आग!

अग्निशमन दलाच्या कर्मचारी किरकोळ जखमी

    02-Apr-2024
Total Views |
Badlapur Chemical Company Fire
 
 
बदलापूर :    बदलापूर एमआयडीसीतील डी. के. फार्मा या रासायनिक कंपनीला आज मंगळवारी भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग विझवताना अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाने ही आग विझविली असली तरी आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बदलापूरच्या एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर १५ येथील डी.के फार्मा या केमिकल कंपनीला दुपारी १२ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली, डी.के.फार्मा या कंपनीत वैज्ञानिक प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे व औषधांसाठी वापरात वापरात येणाऱ्या केमिकलवर प्रक्रिया होत असते. दुपारी अचानक कंपनीच्या ८/३२ या प्लॉटच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रिॲक्टर आणि प्रोसेसर या भागात ही आग लागली.

 
हे वाचलंत का? - ठाण्यासाठी भाजपचा आग्रह कायम - संजीव नाईक स्पष्टच बोलले


यावेळी आगीचे स्वरुप पाहता अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीतील आग प्रतिबंधक यंत्रणेचा वापर करण्यात आल्याने आग जास्त प्रमाणात वाढली नाही अशी माहिती सोनोने यांनी दिली.

कंपनीत एकूण १५० कर्मचारी असून, शिफ्ट नुसार ड्युटी असल्याने, घटना घडली तेव्हा कंपनीत साधारण १०० कामगार असल्याचा अंदाज कंपनी व्यवस्थापक अजित बेहरे यांनी दिली. या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, कंपनीत असलेल्या आग प्रतिबंधक यंत्रणेने आग विझवताना अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून, केमिकल आणि आगीचे डोळ्यांना रिअँक्शन झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या आगीचे निश्चित कारण समजले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही लागली असावा प्राथमिक अंदाज असल्याचे भागवत सोनोने यांनी सांगितले.