आरबीआयकडे २००० रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत

नोटांची कायदेशीर मान्यता कायम

    02-Apr-2024
Total Views |


RBI
 
मुंबई: रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने सोमवारी सांगितल्याप्रमाणे, चलनातील २००० रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत मिळाल्या आहेत. राहिलेल्या ८२०२ कोटी रुपये मूल्यांकनाच्या नोटा या लोकांकडे असल्याचे आरबीआयच्या (RBI) वतीने सांगण्यात आले आहे. १९ मे २०२३ मध्ये अभिसरणातील (Circulation) मधील २००० रुपयांच्या नोटा सरकारने पुन्हा मागितल्या होत्या.
 
एकूण २००० रूपयांच्या एकूण ३.५६ लाख कोटींच्या नोटा १९ मार्च २०२३ पर्यंत असल्याच्या आरबीआयच्या वतीने सूचीबद्ध केल्या होत्या. नोटा रद्द करण्याच्या निकालानंतर चलनात मार्च २९ मध्ये ८२०२ कोटींच्या नोटा अभिसरणात घटले होत्या असे आरबीआयने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
 
१९ मे २०२३ पर्यंत त्यातील ९७.६९ टक्के नोटा परत आल्याचे आलबीआयने म्हटले आहे. २००० रुपयांच्या नोटांची कायदेशीर मान्यता कायम आहे. अजूनही जनता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या २००० रुपयांच्या नोटा सरकारकडे जमा करू शकतात. १९ आरबीआयच्या कार्यालयांपैकी कुठेही या नोटा भरता येणार असल्याचे आरबीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे. यापूर्वी आरबीआयने या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत भरण्यासाठी आवाहन केले होती ही मुदत नंतर ७ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली होती.
 
नोटबंदीनंतर २०१६ मध्ये आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या.