श्रेयस तळपदे ‘लव्ह यु शंकर’ चित्रपटात झळकतोय वेगळ्या अंदाजात

    19-Apr-2024
Total Views |

shreyas  
 
 
मुंबई : मरणाच्या दारातून परत आलेला अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) पुन्हा नव्या जोमाने काम करु लागला आहे. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित ही अनोखी गाठ या चित्रपटात तो झळकला होता. आता पुन्हा एकदा तो लव्ह यु शंकर या लहान मुलांसाठीच्या चित्रपटात झळकत आहे. आज १९ एप्रिललाच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून यात श्रेयस विशेष भूमिकेत दिसत आहे.
 
लहान मुलांना उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करायची असल्यास हा चित्रपच नक्कीच त्यांचे मनोरंदन करणारा ठरेल. ‘बाल गणेशा’ हा अॅनिमेशनशी जोडणारा चित्रपट ‘लव्ह यु शंकर’ चित्रपटाशी मिळताजुळता आहे.
 
 
 
श्रेयस व्यतिरिक्त या चित्रपटात तनिषा मुखर्जी, अभिमन्यू सिंग आणि हेमंत पांडे यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. राजीव एस. रुईया यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती तेजस देसाई आणि सुनीता देसाई यांनी केली आहे. हिंदीसह तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.