Q4 Results: इन्फोसिसला ७९६९ कोटींचा निव्वळ नफा महसूलात १.३ टक्क्याने वाढ

19 Apr 2024 13:07:51

Infosys
 
मुंबई: देशातील क्रमांक २ ची आयटी कंपनी इन्फोसिसने काल चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. मागील कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ६१२८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागिल वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात कंपनीला वाढ झाली. या वर्षी कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ७९६९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.कंपनीच्या कामकाजातून महसूलात १.३ टक्क्यांनी वाढत ३७९२३ कोटींवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षात हा नफा ३७४४१९ कोटी रुपये होता.
 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या तिमाही बेसिसवर (QOQ) कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे.कंपनीने भागभांडवल धारकांना २० रूपये लाभांश (Dividend) प्रति समभाग (Shares) निश्चित केला आहे.कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिंन २०.७ टक्क्यांवर पोहोचले असूनदेखील इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या मार्जिंनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ०.४ टक्क्यांनी घट झाली आहे.कंपनीच्या उत्पन्नात घट झाली असली तरी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आम्ही सकारात्मक असून यावर्षी उत्पन्नाचं वाढ होणार असल्याची कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे.
 
प्री मार्केट ट्रेडिंग ८ टक्क्यांनी खालावल्यानंतर सकाळच्या सत्रात इन्फोसिस समभागात २ टक्क्यांनी घसरण झाली होती . गेल्या महिन्यात इन्फोसिसचे समभाग सरासरी १० टक्क्यांपर्यंत खाली आले होते. इन्फोसिस तिमाही निकालावर तज्ज्ञांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत
 
Powered By Sangraha 9.0