मसाबा गुप्ताने दिली गुडन्यूज, लवकरत येणार चिमुकला पाहुणा!

19 Apr 2024 10:57:24
अभिनेत्री नीना गुप्ता आजी होणार असून त्यांनी मसाबाला अनेक आशिर्वाद दिले आहेत.
 

masaba  
 
मुंबई : हिंदी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा (Masaba Gupta) हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच ती आई होणार असल्याची आनंदवार्ता तिने सोशल मिडियाद्वारे शेअर केली आहे. अभिनेता सत्यदीप मिश्रा सोबत तिने (Masaba Gupta) काही वर्षांपुर्वी लग्नगाठ बांधली होती. दरम्यान, नीना गुप्ता आजी होणार असल्यामुळे त्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
 
मसाबा गुप्ता हिने इन्स्टाग्रामवर गरोदर महिलेचा एक इमोजी शेअर केला. त्यानंतर डोळ्यात हार्ट् असलेले आई आणि बाबाचे असे दोन इमोजी शेअर केले. आणि त्यानंतर शेवटी तिसऱ्या पोस्टमध्ये तिने पतीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "छोटी पावलं आमच्याकडे चालत येत आहेत. तुमचं खूप प्रेम, आशीर्वाद आणि केळ्याचे वेफर्स(फक्त प्लेन सॉल्टेड) पाठवा”.
 
 
masaba
 
तर नीना गुप्ता यांनी देखील आमच्या मुलांना मुल होणार आहे, याहून जास्त आनंद काय असू शकतो असे कॅप्शन टाकून आपला आनंद सोशल मिडियावर व्यक्त केला आहे. तसेच, मसाबाने दिलेल्या या गुडन्यूजमुळे तिच्यावर इंडस्ट्रीमधील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 

masaba  
Powered By Sangraha 9.0