रजनीकांत ते कमल हसन; दाक्षिणात्य अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

    19-Apr-2024
Total Views |
elections  
 
 
मुंबई : सध्या देशात लोकसभा २०२४ च्या (Loksabha Elelctions 2024) निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणूकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून आज तमिळनाडूमध्ये सामान्य नागरिकांसह दाक्षिणात्य कलाकारांनी देखील जबाबदारीने मतदान (Loksabha Elelctions 2024) केले. अगदी रजनीकांत पासून ते कमल हसन पर्यंत सगळ्यांनी मतदान करत लोकांनी देखील मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
 
 
 
देशात लोकशाहीया उत्सवाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज १९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. आज राज्यातील पाच तर देशात १०२ जागांवर मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये सुरु झालेल्या मतदानात रजनीकांत, कमल हसन, धनुष, सुर्या शिवकुमार, कॉमेडियन योगी बाबू, त्रिशा क्रिशनन, यांनी मतदान केले. तर सुपरस्टार अभिनेता अजित कुमार हा देखील तिरुवनमियुर येथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेला होता.
 
 
 
दाक्षिणात्य अभिनेता कार्थी याने देखील मतदानाचा हक्क बजावला असून माध्यमांशी बोलताना त्याने लोकांना आवाहन केले ही आजचा मतदानाचा दिवस हा सुट्टीचा आहे असं न समजता लोकांनी मतदान केले पाहिजे.