कीर्ती महाविद्यालयामध्ये 'जयंतस्मृती' चे आयोजन

    19-Apr-2024
Total Views |
Kirti College news

मुंबई : 'विज्ञानाचा समाजाला फायदा होऊ शकतो असे म्हणणे पुरेसे नाही, परंतु प्रत्यक्षात तसे होणे आवश्यक आहे. विज्ञानांचे लाभार्थी मग विज्ञानचे प्रवर्तक होतील अशा समाजात विज्ञान कधीच मरणार नाही' असे प्रतिपादन प्रो. डॉ. वी. एन जगताप (S.N. Bose नॅशनल सेंटर फॉर वेसिक सायन्सचे अध्यक्ष) यांनी केले.दादरच्या कीर्ती महाविदयालयात स्व. जयंतराव सहस्त्रबुध्दे हयांच्या जयंतीनिमित्त 'जयंतस्मृती' या कार्यक्रमात 'भारताच्या सर्व समावेशक विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' या व्याख्यानात ते बोलत होते. समाजपयोगी विज्ञानासाठी आपण काय केलं पाहिजे यावर अनेक उदाहरणातून प्रकाशझोत टाकला. मुंबई विद्यापीठ डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विदयमाने 'जयंतस्मृती' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष डॉ. अजय भामरे (प्र. कुलगुरू, मुंबई विदयापीठ), डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रबंधक डॉ. एम. बी. केकरे उपस्थित होते.अखिल भारतीय स्तरावर स्वदेशी विज्ञान चळवळ सुरू करण्यासाठी १९९१ मध्ये विज्ञान भारती ही संघटना उदयास आली. यांच्या देशभरात २२ राज्यांमध्ये शाखा आहेत. अनेकविध क्षेत्रामध्ये संस्थेचे काम चालू असते. स्वदेशी भावनेसह गतिशील विज्ञान चळवळ म्हणजे विज्ञान भारती. शर्व भारतीय भाषांमध्ये स्वदेशी चेतनेसह विज्ञान चळवळ सक्रीय करणे या मुख्य उद्देशाने विज्ञान भारती कार्यरत असते.

या कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आणि महाविदयालय विकास समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नील हेळेकर, विज्ञान भारती कोंकण प्रांत कार्यवाह, साठये महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, कीर्ती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. पवार, मा. राज्यपालांचे मुंबई विदयापीठाच्या व्यवस्थापन परिपदेवरचे प्रतिनिधी डॉ. शेषाद्री चारी, NMITD च्या प्रभारी संचालिका डॉ. रसिका मल्ल्या, कीर्ती महाविदयालयाचे उप-प्राचार्य डॉ मीनल मापुसकर, उप-प्राचार्य डॉ. मिलिंद जोग, विज्ञान क्षेत्राशी निगडीत अनेक मान्यवर व विज्ञान भारतीचे अनेक सदस्य उपस्थित होते.


विज्ञान भारती तर्फे राबविल्या गेलेल्या अनेक उपक्रमातील सहभागी विदयार्थ्यांना यावेळी वक्षीसे देण्यात आली.आपल्या अध्यक्षीय भाषणात (मुंबई विदयापीठाचे प्र-कुलगुरू) डॉ. अजय भामरे यांनी स्व. जयंतराव सहस्त्रबुध्दे यांच्या समवेत राहिलेल्या कार्यकाळाबद्दल सांगून त्यांच्या वद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. स्व. जयंतरावांना मुंबई विद्यापीठामध्ये अनेक उपक्रम राववायचे होते. यावावतही भामरे सरांनी माहिती दिली. विज्ञान भारतीचे क्षेत्रीय संघटन मंत्री (महाराष्ट्र, गोवा, गुजरात, पश्चिम क्षेत्र) श्रीप्रसादजी यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.वक्षीस समारंभातील यादीचे वाचन श्री सुभाष पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी आभार मानले, तर रूपाली वेरीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.