एस अँड पी ग्लोबलकडून भारतीय बँकांचा सन्मान! आशिया पॅसिफिक खंडात भारतीय बँका सर्वोत्तम

एचडीएफसी आयसीआयसीआय,स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांना पहिल्या ५० बँकामध्ये स्थान

    19-Apr-2024
Total Views |

S & P Global
 
मुंबई: एस अँड पी ग्लोबल या मार्केट इंटेलिजन्स कंपनीच्या सर्वेक्षणात तीन भारतीय बँकांनी पहिल्या ५० बँकेत स्थान मिळवले आहे. एशियन पॅसिफिक विभागात एचडीएफसी बँक,आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांना पहिल्या ५० मध्ये स्थान मिळाले आहे.आर्थिक वर्ष २०२२ मध्ये देखील दोन भारतीय कंपन्यांनी पहिल्या ५० बँकांत स्थान मिळवले होते. एस अँड पी ग्लोबलमधील या नव्या अहवालामुळे भारताच्या यशात अजून एक भर पडली आहे.
 
उत्तर कामगिरी करणाऱ्या बँकांमध्ये या भारतीय बँकांचा समावेश करण्यात आला आहे. आर्थिक परिमाणात सुधार,चांगले मॅट्रिक्स,पत निर्मितीत केलेली वाढ अशा मुद्यावर या बँकांची निवड या सर्वेक्षणात झाली आहे. अहवालात म्हटल्याप्रमाणे, बँकांची मालमत्ता आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५०.५ टक्क्यांनी वाढ होऊन मालमत्तेचे मूल्यांकन १.५१ युएस ट्रिलियन डॉलर झाले आहेत.
 
या फायनांशियल सर्विसेस व अनालिटीक्स कंपनी एस अँड पी ग्लोबलने आशियातील सगळ्यात चांगले प्रदर्शन भारतीय बँकांनी केल्याचे म्हटले आहे.जुलै २०२२ मध्ये एचडीएफसी बँकांने हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये सलग्न केल्यानंतर ही मोठी वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.कारण एचडीएफसी बँकेची मालमत्ता विलीनीकरणानंतर ४६६.३५ अब्ज डॉलरवर पोहोचली असल्याचे यात नमूद केले आहे.
 
एस अँड पी ग्लोबलने म्हटल्याप्रमाणे, भारतात आरबीआयच्या उपक्रमांमुळे पत निर्मितीत मोठी वाढ झाली आहे.ही वाढ १४.९ टक्क्यांनी झाले असल्याचे एस अँड पी ने सांगितले आहे.
 
भारतातील अधिकृत आकडेवारीनुसार,भारतीय अर्थव्यवस्था ७.८ व ७.६ टक्क्यांनी अनुक्रमे एप्रिल ते जून व जुलै ते सप्टेंबर तिमाहीत झाली आहे.आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७.२ टक्क्याने वाढली होती. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ही वाढ ८.७ टक्के राहीली होती. केंद सरकारने मार्चपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ७.६ टक्यांने वाढू शकते असे म्हटले होते.