'या' चित्रपटावर भन्नाट ऑफर! एका तिकीटावर एक तिकीट फ्री!

    19-Apr-2024
Total Views |
विद्या बालनच्या चाहत्यांसाठी एक खास ऑफर तिच्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने आली आहे.
 

book my show 
 
मुंबई : विद्या बालन आणि प्रतिक गांधी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) हा चित्रपट १९ एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. शिर्षा ठाकुर्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून एका स्त्री दिग्दर्शिकेच्या नजरेतून वैवाहिक जीवन आणि त्या नात्यांत येणारे दुरावे किंवा चांगले क्षण पाहता येणार आहेत. दरम्यान, या (Do Aur Do Pyaar) चित्रपटाने प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. एका तिकीटावर एक तिकीट मोफत अशी ऑफर चित्रपटाची टीम प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे.
 
बुक माय शो या अॅपवरुन तुम्ही ‘दो और दो प्यार’ या चित्रपटाचे तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला DADP हा कोड वापरल्यास एकावर एक तिकीट मोफत मिळणार आहे.
 
 
 
दरम्यान, ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट भारतात ५४३ आणि जगभरात २७१ स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. यात युएसए, युके, आर्यलंड, युएई, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जर्मनी या देशांचा देखील समावेश आहे. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा देखील हा चित्रपट पाहता येणार आहे.