इतिहासातील स्त्रीचे योगदान काय?

    18-Apr-2024
Total Views |

jijau shivba 
 
मुंबई : बोरीवली येथील इतिहास कट्ट्यावर रविवार दि. 21 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता: स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब या विषयावर इतिहास कट्टा आयोजित केला आहे. भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केन्द्र आयोजित या इतिहास कट्ट्याचे सादरकर्ते इतिहास अभ्यासक रविराज पराडकर असणार आहेत. रविवार, दि . २१ एप्रिल २०२४, संध्या. ५.३० वाजता बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे ' वनविहार उद्यान ', एक्सर, ॐ शांती चौकाजवळ, बोरीवली येथे हा कट्टा संपन्न होणार आहे तसेच या कट्ट्यासाठी प्रवेश विनाशुल्क असणार आहे.
 
भारताच्या इतिहासातील अनेक महान स्त्रियांचे राजकीय व सामाजिक योगदान महत्वाचे आहे. कधी वीरपुत्री, वीरभगिनी, वीरमाता आणि वीरांगनेच्या रुपात तर कधी क्रांतीकारी, सत्याग्रही, समाजसेविकेच्या रुपात आपल्याला ती चे दर्शन होते. दुसऱ्या पर्वातील पहिली गोष्ट आहे, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब. आयोजकांनी सर्व इतिहास रसिकांना काट्यात सहभागी होण्याविषयी आवाहन केले आहे.