काँग्रेसला वंचितचा दणका! उत्कर्षा रुपवते निवडणूक लढवण्याची शक्यता

18 Apr 2024 15:40:02
 
Utkarsha Rupavte
 
अकोला : राज्यात लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु असतानाच आता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, त्या लोकसभा निवडणूक लढवण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
शुक्रवारी लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. मात्र, निवडणूकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. गुरुवारी काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
 
हे वाचलंत का? -  बारामतीच्या लढाईत मोठा ट्विस्ट! अजित पवारांनी स्वत:च भरला अर्ज
 
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील निवासस्थानी हा प्रक्षप्रवेश पार पडला. उत्कर्षा रुपवते या निवडणूक लढवण्यास इच्छूक होत्या. मात्र, त्यांना पक्षाने तिकीट न दिल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात होते. यातूनच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर आता त्यांना वंचिकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे,
 
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील न होता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, काँग्रेसनेच वंचितला डावलल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आता उत्कर्षा रुपवते यांच्या प्रवेश हा काँग्रेसला वंचितचा मोठा धक्का मानला जात आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0