पूजा-पाठ पाखंडी करतात!, देशात एकच नाही हजारो राम मंदिरं आहेत! सपा खासदार बरळला

    17-Apr-2024
Total Views |
SP (2)

सपा नेत्याने केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर पडत आहेत.

नवी दिल्ली : केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राम मंदिर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येच्या तप्त उकाड्यातही भाविकांनी रांगेत उभं राहून रामललाचं दर्शन घेतलं. मात्र, काही राजकीय पक्षांना रामभक्तांच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याची सवयच जणू आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव रामगोपाल यादव यांनीही असेच एक वक्तव्य केले आहे. राम मंदिरावर त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यं केलं आहे. पूजा-पाठ हे पाखंडी करतात, फक्त राम मंदिर अयोध्येतच नाही तर देशात हजारो राम मंदिरं आहेत, त्यांच्या या वक्तव्याचा रामभक्तांनी ट्विटरवर चांगलाच समाचार घेतला आहे.
रामगोपाल यादव यांनी बुधवार, दि. १७ एप्रिल २०२४ रोजी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. पत्रकारांनी यावेळी राम मंदिर निर्माणानंतर पहिल्यांना होणाऱ्या रामनवमी सोहळ्याबद्दल प्रतिक्रिया विचारली. मात्र, गरळ ओकण्याची सवय असलेल्या सपा नेत्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करण्याचं सोडलं नाही. ते म्हणाले "राम नवमी देशात मोठ्या आनंदात साजरी केली जाते. मात्र, काही पक्षांनी राम हा त्यांच्या नावावर पेटंट केला आहे. रामनवमी केवळ त्यांचाच अधिकार नाही रामनवमी हजारो वर्षांपासून साजरी केली जाते.”


इथवर सगळं ठीक होतं, मात्र त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याने रामभक्तांना संताप अनावर झाला. ते म्हणाले, “देशात फक्त एक राम मंदिर नाही, या देशात हजारो राम मंदिरे आहेत. या राम मंदिरात तर मोदी सरकारने अपूर्ण प्राणप्रतिष्ठा केली आहे. भगवान रामच त्यांना शिक्षा देईल.", असे म्हणत राम मंदिरारबद्दल काहींनी केलेल्या वक्तव्याचा दाखला दिला. यानंतर सपा नेत्याला प्रश्न विचारण्यात आला की, श्रीराम नवमी आहे, तुम्ही काही पूजा पाठ वैगरे करता का? यानंतर ते म्हणाले मी रामाचा सच्चा भक्त आहे, मी फक्ता दुरुन नमस्कार करतो. पूजा पाठ करण्यात मी धन्यता मानत नाही, मी पाखंडी नाही, पाखंडी लोक पूजा अर्चना करतात.


सोशल मीडियावर रामगोपाल यांचं वक्तव्यं ऐकल्यानंतर अनेकांना संताप अनावर झाला. समाजवादी पक्ष आणि त्यांच्या नेत्यावर रामभक्तांनी सडकून टीका केली. दीपक शर्मा नावाच्या युझरने त्यांना फक्त निवडणूका येऊदेत रामभक्तच तुम्हाला धडाशिकवतील फक्त रामद्रोह्यांनी वाट पहावी, अशा आशयाची पोस्ट लिहीली आहे. पत्रकार सुशांत सिन्हा यांनीही त्यांना प्रश्न विचारला आहे. राम मंदिरात जे पूजा करतात ते सगळेच तुमच्या मते पाखंडी आहेत का?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.


आशुतोष यादव अभिषेक यांनीही रामगोपाल यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. तुम्हाला जनता सणसणीत चपराक देऊन या निवडणूकीत उत्तर देईल. X यूजर अजीत झा यांनीही राीमगोपाल यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, "तुमचं नाव रामगोपाल आणि तुमच्या आई-वडिलांनी राम-कृष्णाच्या भक्तीमुळे हे नाव निवडलं असेल मात्र, राजकारणाच्या लोभापाई सरळसरळ सनातन धर्माचा अवमान करत आहात. तुमच्यात हिम्मत असेल तर नमाज पठण किंवा चर्चमध्ये जाणाऱ्यांबद्दल एकदा बोलून बघा"