ईदला झाला दरभंगात पुतळ्याचा अवमान, हिंदूंनी रामनवमीला केलं शुद्धीकरण

    17-Apr-2024
Total Views |

news
 

पाटणा : बिहारचा एक भाग आहे, दरभंगा असं या जिल्ह्याचं नाव. बिहारमध्ये ज्या भागाला मिथिला म्हणतात, दरभंगा हा त्याचा एक महत्वाचा हिस्सा मानला जातो. मैथिलि भाषिक दरभंगा जिल्ह्यात रहातात. मात्र, इथे बाहेरून येणाऱ्या काही विशिष्ट समाजातील लोकांची संख्या वाढत चालली आहे. याचाच प्रत्यय ईदच्या दिवशी आला होता. दरभंगाचे दिवंगत महाराज रामेश्वर सिंह यांच्या प्रतिमेचा जमावाने अवमान केला होता. त्यांच्या प्रतिमेवर पाय देऊन हा घोळता बसला होता. दरभंगा राज परिसरात ईदच्या दिवशी तुफान गर्दी झाली होती. तेव्हाची ही घटना आहे.
 
चौरंगी चौकात रामेश्वर सिंह यांची प्रतिमा आहे, या प्रतिमेसोबत सुरू असलेल्या दुर्व्यवहारामुळे लाखो लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. आजही रामेश्वर सिंह यांचे समाजात विशेष स्थान आहे. मात्र, घटल्या प्रकारामुळे लोकांमध्ये तीव्र भावना होती. श्यामा माई मंदिरात ईदच्या दिवशी गर्दी झाली होती. त्यावेळी बोटींगसाठी अनेकजण आले होते. मात्र, काही समाजकंटकांनी रामेश्वर सिंहांच्या पुतळ्याचा अवमान केला. त्यामुळे बोटींगही थांबविण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अल्पवयीनांनी हे कृत्य केले असून त्यांना आम्ही समज देऊन बाजूला केल्याचेही सांगितले.
 
दरभंगा पोलीसांच्या मते, "ही घटना विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत झाली आहे, ज्यात छोट्या मुलांचा सामावेस होता." लीसांनी या घटनेला दुजोरा दिल नाही. पोलीसांनी चौकशी केली तर पुजारी आणि सुरक्षारक्षकांशिवाय अन्य कुणीही यांच्याबद्दल माहिती दिली नाही, असे सांगितले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला कुणीही साक्षीदार मिळाला नाह त्यामुळे आम्ही कारवाई करू शकलेलो नाही. हा पूर्ण मैथिली समाजचा अवमान आहे, असा आरोप लोकांनी केला होता. मात्र, त्यांचा आवाज पोलीसांनी दडपण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र, जनतेचा रोष अखेर उफाळून आलाच. हिंदू समाज एकवटला आण त्यांनी रामनवमीनिमित्त पुतळ्याच्या परिसराचे शुद्धीकरण केले. सुरुवातीला परिसर स्वच्छ केला आणि समाजकंटकांना एक संदेश दिला. दरभंगा राजघराण्याचे उत्तराधिकारी कपिलेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वात हा कार्यक्रम पार पडला. रामनवमीच्या शुभमुर्हूर्तावर एका स्नेह आणि सौदार्हाचे प्रतीक असलेल्या रामेश्वर सिंह यांना आदरांजली वाहिली. प्रभू श्रीरामाची शालीनता ही दुर्बलता नाही, तर सबलतेचे मूर्तीमंत उदाहरण आहे. त्यांना अहंकारी आणि अत्याचारी राक्षसांचा अंत केला होता.
 
कपिलेश्वर सिंह पुढे म्हणाले की, "सन १५७७ मध्ये माझ्या पूर्वजांना मिथीलेचा वारसा मिळाला. माझे आजोबा कामेश्वर सिंहांपर्यंत वंशाचे राजा झाले. माझे पणजोबा रामेश्वर सिंह राजर्षि विशुद्ध सनातनी, हिंदू धर्म महामंडलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अध्यात्मिक महापुरुष होते. त्यांच्या चितेवरच माधवेश्वर श्मसान परिसरात माँ श्यामा माई विराजमान झाल्या, त्या सती गेल्या, मिथीला हे नेपाळपर्यंत धर्मानुयायांच्या आस्थेचे केंद्र आहे. इथल्या तलावात पवित्र नद्यांचे पाणी संचयित केले आहे. तलावात नौकाविहार करण्याऱ्यांनी त्याचे पावित्र्य जपले पाहिजे."
 
त्यांनी बूट-चप्पला घालून रामेश्वर सिंहांच्या प्रतिमेवर चढणाऱ्यांचा विरोध केला. भविष्यात या जागेला पूर्णपणे सुरक्षित जाळ्यांचे कुंपण घालणार असल्याचेही त्यांनी सा्गिले. रामनवमीच्या निमित्त दरभंगा महाराजांच्या प्रतिमेसमोर नृत्य आणि मिथीला कला प्रदर्शन सादर झाले. माँ श्यामा माई मंदिरात पूजा संपन्न झाली. गंगा यमुनेसह पाच पवित्र नद्याचे जल आणून शुद्धीकरण करण्यात आले. तसेच परत असे कृत्य घडल्यास कारवाईस तयार रहा, असा इशाराही देण्यात आला आहे.