आज रामनवमीला शेअर बाजार बंद राहणार

17 Apr 2024 10:31:21

Stock Market
 
 
मुंबई: आज रामनवमी निमित्ताने शेअर बाजार आज बंद राहणार आहे.आजच्या दिवशी कुठलेही इक्विटी ट्रेडिंग होणार नाही. आज शेअर बाजाराव्यतिरिक्त बाँड व कमोडिटी बाजार पण बंद राहणार आहे. नेहमीप्रमाणे पुन्हा बाजार उद्या गुरुवारी चालू होणार आहे.
 
बीएसई व एनएसईच्या संकेतस्थळानुसार आज दोन्ही ठिकाणी शेअर बाजार बंद राहणार आहे. आज एमसीएक्स (Multi Commodity Exchange) आज सकाळचे सत्र बंद राहणार आहे व संध्याकाळचे सत्र नियमितपणे सुरू राहणार आहे. यानंतर १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे. संध्याकाळी ५ ते ११.३० च्या सत्रात आज कमोडिटी बाजार सुरू राहिल.
 
इराणच्या इस्त्राईलवरील हल्ल्याने पुन्हा गुंतवणूकदारांनी धास्ती घेतली असल्याने काल बाजारात मोठ्या अंकाने गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. काल सेन्सेक्स ४५६.१० अंशाने घसरत ७२९४३.६८ पातळीवर तर निफ्टी ५० १२४.६० अंशाने घसरत २२१४७.९० पातळीवर पोहोचला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0