रामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येत रामललाच्या चरणी मराठमोळ्या गायिकेची गायनसेवा

17 Apr 2024 14:56:52
ज्येष्ठ गायिका देविका पंडित यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आणि आपल्या गायकीतून सेवा देखील केली.
 

devki  
 
अयोध्या : “राम जन्मला गं सखी.. राम जन्मला”, आज याच गाण्यांच्या ओळी प्रत्येकाच्या मुखी आहेत. रामनवमीच्या (Ramnavami) निमित्ताने लाखो भाविक अयोध्यात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. याच गर्दीत एक चेहरा अधोरेखित झाला. ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांनी अयोध्येत रामलललाचे दर्शन घेत प्रभू रामाच्या चरणी गायनसेवा (Ramnavami) देखील केली.
 

devki  
 
देवकी पंडित यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन काही फोटो शेअर केले आहेत. रामनवमीच्या शुभदिनी त्यांना अयोध्येला जाता आल्याचा आनंद आणि त्यातही प्रभू श्रीरामाच्या सहवासात मिळालेली गाण्याची संधी या त्यांच्या आनंदी भावना दिसून येत आहेत. दरम्यान, देवकी पंडित यांनी रामलललाचे दर्शन घेतानाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रभू श्रीरामाच्या आशिर्वादाने तुम्हा सगळ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती राहो हिच इच्छा!”.
 
 
Powered By Sangraha 9.0