गायिका मुग्धा वैशंपायन हिने संगीतबद्ध केलेले ‘राघवा रघुनंदना’ गाणे अडीच वर्षांनंतर प्रदर्शित
मुंबई : देशभरात आज प्रभू श्रीरामाच्या जन्माचा (Ramnavami ) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. भक्तिभावाने लोकं प्रभू रामाची पूजा करत आहेत. अशात आजच्या या शुभदिनी गायिका मुग्धा वैशंपायन हिने स्वत: संगीतबद्ध केलेले (Ramnavami) गाणे प्रदर्शित झाले आहे. 'राघवा रघुनंदना' असे हे गाणे असून खास रामनवमीच्या दिनानिमित्त तिने रामभक्तांना ते अर्पित केले आहे.
मुग्धा वैशंपायन राघवा रघुनंदना या गाण्यासाठी गेले अनेक वर्ष मेहनत करत होती. आण अखेर आज ते प्रदर्शित झाले आहे. याशिवाय तिचा पती प्रथमेश लघाटे याने देखील दोन वर्षांपुर्वी अंतरी माझ्या श्रीराम हे गाणं भेटीला आणले होते. आणि विशेष म्हणजे प्रथमेशने केवळे ते गायले नव्हते तर तबला, ताल वाद्य, तालवाद्य संयोजन, मिक्सिंग, मास्टरींग, सिनेमॅटोग्राफी, व्हिडीओ ए़डिटिंग या सर्व जबाबदाऱ्या त्याने एकट्याने सांभाळल्या होत्या.