अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार, धर्मांतरण अन् निकाह; आरोपी साबीर पोलिसांच्या ताब्यात

    17-Apr-2024
Total Views |
Conversion
जयपूर : राजस्थानमधील अलवरमध्ये एका अल्पवयीन मुलीला साबीर नावाच्या तरुणाने जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर साबीरने अल्पवयीन मुलीचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करून तिच्याशी लग्न केले. अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कारही करण्यात आला. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी साबिरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अलवर येथील बागड का तिराहा येथे राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. १३ एप्रिल २०२४ रोजी तिच्या घरातून जवळच्या बाजारपेठेत गेली होती. मात्र, सायंकाळपर्यंत मुलगी परतली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. कुटुंबीयांनी शोध घेतला असता, त्यांना जवळच्या गावातील साबीर याने मुलीला घेऊन गेल्याचे समजले. या माहितीनंतर मुलीचे कुटुंबीय साबीरच्या घरी पोहोचले. साबीरच्या कुटुंबीयांनी दलित कुटुंबाची दिशाभूल करून मुलगी शोधण्यात मदत करू, असे सांगितले. त्यानंतरही कुटुंबीयांना मुलीचा शोध लागला नाही.
 
 
यानंतर, पीडितेचे कुटुंबाने पोलिस स्टेशन गाठले. संशयाच्या आधारावर पोलिस आणि पीडितेचे कुटुंबीय साबीरच्या घरी पोहोचले जिथे त्यांना समजले की अल्पवयीन मुलीचे इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यात आले आहे आणि तिचे साबीरशी जबरदस्तीने लग्न करण्यात आले आहे. साबीरने मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी रामगड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
 
पोलिसांनी सबितविरुद्ध पोक्सो आणि अपहरणासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. साबीरविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबासोबतच त्यांच्या समाजातील लोकही संतापले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक ओमप्रकाश बिश्नोई यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.