'बजरंगबलीला मिळणार श्रीरामांची साथ', रामनवमीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान'ची घोषणा

17 Apr 2024 18:10:35
‘हनुमान’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘जय हनुमान’ चित्रपट येणार भेटीला
 

hanuman  
 
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान’ (Jai Hanuman) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाचा पुढचा भाग येणार असे सांगितले जात असतानाच आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. ‘जय हनुमान’ (Jai Hanuman) असे या चित्रपटाचे नाव असून पोस्टर रिलीज करत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
 
 
 
'वचनं धर्मस्य रक्षणं' असे कॅप्शन लिहत पोस्टर आज रामनवमीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आले. 'हनुमान'चे दिग्दर्शक प्रसंत वर्मा यांनी हे पोस्टर प्रदर्शित केला असून, "त्रेतायुगात एक पवित्र वचन मी तुम्हाला दिलं होतं. त्या वचनाचं पालन आणि संरक्षण कलियुगात केलं जाईल", असे त्यांनी कॅप्शनमधून म्हटले आहे. दरम्यान, या पोस्टरमध्ये बजरंगबलीला श्रीरामांची साथ मिळाली असून दोघांचा हात एकमेकांच्या हातात असल्याचे दिसते.
 
'हनुमान'च्या सुपरहिट यशानंतर प्रसंत वर्मा 'जय हनुमान' चित्रपट भेटीला घेऊन येत असून याही भागात अभिनेता तेजा सज्जा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अद्याप प्रदर्शनाची तारीख समोर आली नसली तरी २०२५ मध्येच प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे.
Powered By Sangraha 9.0