एकनाथ खडसेंना धमकीचे फोन!

17 Apr 2024 14:14:17
 
Eknath Khadse
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आल्याची माहिती पुढे आली आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या नावाने हे फोन आले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.
 
याबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "आज सकाळपर्यंत पाच वेळा धमकीचे फोन आले आहेत. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेश भागातून आल्याचे ट्रु कॉलरवर लक्षात आले आहे. यामध्ये दाऊद आणि छोटा शकीलच्या नावाचा उल्लेख आहे." असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  सांगलीचा वाद तापला! राऊतांकडून विशाल पाटलांच्या हकालपट्टीची मागणी
 
तसेच "तुम्हाला मारणार असल्याचे या फोनवर मला सांगण्यात आले. हा कुणाचातरी खोडसाळपणा असावा असं मला वाटलं. परंतू, वारंवार फोन आल्याने याबद्दल पोलिसांना सूचित केले आहे. यासंदर्भात त्यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0