मोठी बातमी: भारताच्या जीडीपीत ६.८ टक्क्यांनी वाढ होणार - IMF

17 Apr 2024 11:19:18

IMF
 
 
मुंबई: आयएमएफने (IMF) ने आनंदाची बातमी दिली आहे. International Monetary Fund (आयएमएफ) ने भारताच्या जीडीपीत मोठी वाढ होण्याचे सांगितले आहे. मागे आयएमएफने भारताच्या जीडीपी (Gross Domestic Product) म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनात ६.५ टक्क्यांनी वाढ होण्याचे दर्शविले होते. परंतु हा अंदाज खोडता स्वतः आयएमएफने भारताच्या जीडीपीत ६.५ टक्यांच्या ऐवजी ६.८ टक्क्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
भारतातील विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर ही वाढ होऊ शकते. भारतातील वस्तू व सेवांची वाढती मागणी व नोकरी व्यवसायक्षम वाढलेल्या लोकसंख्येमुळे ही वाढ होण्याचे आयएमएफने म्हटले आहे. याशिवाय एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) व एस अँड पी (S & P Global) व मूडीजनेही भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होण्याचे म्हटले होते.
 
काल चीनच्या अर्थव्यवस्थेत ५.३ टक्क्याने वाढ झाल्याचे प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे. भारताची अर्थव्यवस्था मागील वर्षाप्रमाणे यंदा ३.२ टक्क्यांनी वाढणार आहे.आयएमएफने सांगितल्याप्रमाणे जगाच्या अर्थव्यवस्थेत लवचिकपणा वाढणार आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात महागाईत घट झाली होती.
 
एप्रिलमधील अर्थव्यवस्थेतील अहवालात आयएमएफने म्हटले आहे, जागतिक अर्थव्यवस्थेतील संकटात घट झाली असून त्यावर नियंत्रण आले आहे. जागतिक इस्त्राईल गाझा युद्ध, रशिया युक्रेन, वाढती महागाई असूनदेखील कामगार लेबर मार्केट व व्याजदरात किंचित वाढ झाली आहे.
 
प्रमुख अर्थव्यवस्थांमधील महागाई कमी होण्याच्या वेगात फरक पडल्याने चलनात हालचाली देखील होऊ शकतात ज्यामुळे आर्थिक क्षेत्रांवर दबाव येतो. स्थिर-दर पुनर्संचयित झाल्यामुळे आणि कुटुंबांना कर्जाचा सामना करावा लागत असल्याने उच्च व्याजदरांमुळे कल्पनेपेक्षा अधिक वेगळे परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक ताण येतो, असे त्यात म्हटले आहे.
 
अर्थव्यवस्थेतील वाढलेल्या आव्हानातही भारताच्या जीडीपीत ७ टक्के वेगाने वाढ होऊ शकते असे आयएमएफचे कार्यकारी संचालक क्रिष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांनी मुलाखतीत प्रसारमाध्यमांना म्हटले आहे.चौथ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीत ८ टक्क्यांनी वाढ होऊ शकते असे ते पुढे म्हणाले.
 
जागतिक अर्थव्यवस्थेतील तुलनेत भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत विचारले असता त्यांनी,"मला वाटते की नजीकच्या भविष्यात भारत हा जागतिक विकासाचा चालक राहील. जागतिक वाढीला जास्तीत जास्त योगदान देणारा भारतातील वाढ सातच्या पुढे राहण्याची माझी अपेक्षा आहे. या दशकातील टक्के तुम्हाला आठवेल, जेव्हा मी सरकारसोबत होतो तेव्हा मी भाकीत केले होते की भारत 7 टक्के वाढीसह बाहेर येईल.' असे म्हणाले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0