पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहिर

17 Apr 2024 11:03:49
अभिनेते रणदीप हुड्डा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
 

amitabh bachchcan  
 
मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांना दिल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा १६ एप्रिल रोजी मुंबईत करण्यात आली आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना जाहिर झाला आहे. मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्करांची घोषणा करण्यात आली.
 
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्त प्रदान केले जाणारे पुरस्कार पुढीलप्रमाणे:
 
१- लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – पद्मविभूषण अमिताभ बच्चन
२- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – ए.आर.रेहमान (प्रदीर्घ संगीत सेवा)
३- मोहन वाघ पुरस्कार – गालिब नाटक (उत्कृष्ट नाट्यनिर्मिती २०२३-३४)
४- आनंदमयी पुरस्कार (आशा भोसले) पुरस्कृत) – दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल (समाज सेवा)
५- वाग्विवासीनी पुरस्कार – मंजिरी फडके ( प्रदीर्घ साहित्य सेवा)
६- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – अशोक सराफ ( प्रदीर्घ नाट्य-चित्रपट सेवा)
७- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा)
८- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – रुपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा)
९- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – भाऊ तोरसेकर ( प्रदीर्घ पत्रकारिता सेवा)
१०- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – अतुर परचुरे (प्रदीर्घ नाट्य सेवा)
११- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – रणदीप हुड्डा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती)
 
दरम्यान, मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिल रोजी विलेपार्ले येथील दीनानानाथ नाट्यगृह येथे संपन्न होणार असून सर्व पुरस्कार पद्मविभूषण आशा भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0