"नक्षलवादांच्या एन्काऊंटर खोटा!", काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्रांनी तोडले तारे! जवानांचा केला अपमान

17 Apr 2024 18:19:02

Bhupesh Baghel


राँची
: भारताला गेली कित्येक दशके नक्षलवाद्यांनी पोखरण्याचा प्रयत्न केला. बिहार-झारखंडपासून छत्तीसगड ते महाराष्ट्रापर्यंत नक्षलवाद्यांनी रक्ताचे पाट वाहिलेत. महाराष्ट्रातील गडचिरोतील नक्षलग्रस्त भागातील हिंसाचार नवा नाही. छत्तीसगडमध्ये तर नक्षलींनी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा खात्मा केला होता. आता याच छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी २९ नक्षलींना कंठस्नान घातले आहे. नक्षलवादाविरोधातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या कारवाईपैकी ही एक कारवाई आहे.


मृतांमध्ये १२हून अधिक महिलांचा सामावेश आहे. ज्या सशस्त्र अवस्थेत पुरुषांच्या संरक्षणासाठी पुढे राहत होत्या. राज्य पोलिसांचे राखीव दिल आणि ‘बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF)’ या दोघांनी ही मोहिम फत्ते केली. गेल्या दशकभरातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अद्यापही शोधमोहिम सुरूच आहे. यापूर्वी २०१६मध्ये ३० आणि २०२१ मध्ये २५ नक्षलींना ठार करण्यात आले होते.


विशेष म्हणजे सुरक्षा दलांना कुठल्याही प्रकारचे नुकसान पोहोचले नाही. हे ऑपरेशन काँकेड जिल्ह्यातील छोटेबेठीया ठाण्याच्या अंतर्गत चालविण्यात आले. AK-47 पासून अन्य अधिक शक्तीशाली हत्यारे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहेत. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदर राज यांनीही स्पष्ट केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० हत्यारे हस्तगत केली आहे. नक्षलींकडून मोठी शस्त्रास्त्रेही हस्तगत केली आहे. जे दोन बडे नक्षलीलीडर ठार केले ते म्हणजे शंकरराव आणि ललिता, अशी त्यांची नावे आहेत. या वर्षात एकूण ७९ नक्षलींना कंठस्नान घालण्यात आले आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत नक्षलीच आहेत. यात कुणीही ग्रामस्थ नव्हते. काही जणांनी हे ग्रामस्थ असल्याचा आरोप लावला होता, त्यांना आरोपांशिवाय दुसरी कामे नाहीत. नक्षलींविरोधातील ही लढाई निर्णायक स्थितीत आली आहे. भविष्यात ही आणखी कठोर होणार आहे. पोलीसांचे म्हणणे आहे की, नक्षलविरोधी मोहिम योग्य दिशेने सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबद्दल दुजोरा दिला आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून नक्षलवादाचा बिमोड करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. छत्तीसगडमध्येही भाजप सत्तेत आल्यापासून ही कारवाई अधिक कठोर झाली आहे.

ते म्हणाले, "छत्तीसगडमध्ये गेल्या तीन महिन्यांत ८० नक्षलींना कंठस्नान घातलं. १२५हून अधिक जण तुरुंगात गेले होते. त्यानंतर १५० हून अधिक जणांनी आत्मसमर्पण केली आहे. त्यांनी नक्षलवादाला उचलून फेकून देण्याचा निर्णय पण आम्ही घेतला आहे, असेही ते म्हणाले. मात्र, काँग्रेसने ही खोटी कारवाई आहे, असा आरोप केला आहे. ही खोटी चकमक होती, असा आरोप काँग्रेस तर्फे करण्यात आला आहे. यापूर्वीही पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईकनंतरही मोदी सरकारकडे पुरावे मागितले होते.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काही दिवसांपूर्वी निवडणूकीत मोठा पराभव पत्करावा लागला आहे. त्यानी निवडणूकीतील एका भाषणात याच नक्षलवाद्यांच्या एन्काऊंटरबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप काळात खोटे एन्काऊंटर होत असतात, असे वादग्रस्त विधान बघेल यांनी केले आहे. या प्रश्नी छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बघेल यांनी सिद्ध करावं अन्यथा जवानांची माफी मागावी, असे खडेबोल त्यांना सुनावली आहे.



Powered By Sangraha 9.0