हमासला समर्थन, मोदींना शिवीगाळ, हिंदूंप्रति घृणा शेवटी नोकरी गेली अन् रवानगी तुरुंगात

16 Apr 2024 13:24:23

Riddhi Patel

(Riddhi Patel - Image Credit - OpIndia)
वॉशिंग्टन :  अमेरिकेत रहाणाऱ्या भारतीय मूळ वंशाच्या फिलीस्तानी समर्थक आणि हिंदूविरोधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या रिद्धि पटेलला नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आले आहे. सेंटर ऑफ रेस, पावर्टी एन्ड एनवायरनमेंट’ या संस्थेत ती कार्यरत होती. या संस्थेने आपल्या एक्स अकाऊंटवर रिद्धीला नोकरीवरुन कमी केल्याची माहिती दिली आहे. एक्सवर पोस्ट करत सीआरपीईने म्हटले आहे की, हिंसा, अनैतिक व्यवहार आणि धमक्यांची आम्ही कठोर निंदा करत आहेत. सीआरपीईने म्हटले आहे की, याच कारणास्तव रिद्धि पटेलला बरखास्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला."



एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “सेंटर ऑन रेस, पॉवर्टी एंड द एनवायरनमेंटला (सीआरपीई) १० एप्रिल २०२४ रोजी बेकर्सफील्ड सिटी कौन्सिलच्या बैठकीत माजी कर्मचारी रिद्धि पटेल यांच्याशी निगडीत एका घटनेची माहिती मिळाली. आम्ही कुठल्याही प्रकारच्या हिंसाचार आणि धमकीची निंदा करतो. आम्ही ३५ वर्षांपासून आमच्या सर्व कामात सत्यनिष्ठा आणि सर्व मानकांचा विचार करण्यासाठी कटीबद्ध आहोत. याच मुळे आम्ही रिद्धी पटेल यांना बडतर्फ करण्याच निर्णय घेतला. हा निर्णय कठीण होता मात्र सावधानता आणि संवेदनशीलपणे ही परिस्थिती आम्ही हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत."


संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "सीारपीई आपल्या संकल्पावर लक्ष केंद्रीत करणार आहे. ज्यांची आम्ही सेवा करतो त्यांच्याप्रति आम्ही कार्य करतच राहू. अहिंसा, सर्वसामावेशकता आणि सन्मान संस्कृतीसाठी कटीबद्ध राहू. दरम्यान, रिद्धी पटेल ही २८ वर्षीय मूळ भारतीय वंशाची आहे. मात्र, हिंदूविरोधी वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहिलेली आहे. रिद्धी पटेल पूर्वाश्रमीची खेळाडू असल्याने सीआरपीईमध्ये नोकरीत रुजू झाली होती. मात्र, आपल्या वाचाळवीर स्वभावामुळे नोकरीवर कुऱ्हाड कोसळली. काही दिवसांपूर्वी तिने कॅलिफोर्निया स्थित बेकर्सफील्डमध्ये मेअरला जीवे मारण्याची धमकी दिली होती.



त्यानंतर मेअर करेन गोह यांनी पोलीसांना तिला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यानंतर पोलीसांनी तिला कोर्टात हजर केले. त्यावेळी तिने या सगळ्याचा विरोध केला. घटना प्रकार व्हिडिओत कैद झाला आणि सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला. याबद्दल अमेरिकन नागरिकांनीही रोष व्यक्त केला आहे. ज्यावेळी मेअरला धमकी देण्याची वेळ आली होती तेव्हा तर डोळ्यात अश्रू आले नाहीत मात्र, जेव्हा अद्दल घडली तेव्हा तिला अश्रू अनावर झाले होते. यापूर्वीही हिंदूविरोधी वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती. तिने हमास या फिलिस्तान स्थित दहशतवादी गटाचे समर्थन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वारंवार अवमानकारक वक्तव्य केली होती. मोदी आणि भाजपला तिने हिंदू फॅसिस्टवादी म्हटले होते. वारंवार अपशब्दांचा उच्चार केला होता.

Powered By Sangraha 9.0