मार्च महिन्यात घाऊक महागाई दरात ०.५३ टक्क्यांनी वाढ

15 Apr 2024 14:01:56

WPI
 
 
मुंबई: घाऊक महागाई दरात वाढ झाल्याचे सरकारने सोमवारी सांगितले आहे. घाऊक किरकोळ दरात मागील महिन्यातील ०.२० टक्यांच्या या महिन्यात ०.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बटाटा, कांदे, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने ही वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे.
 
मागील एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक (Wholesale Price Index) हा नकारात्मक होता. परंतु नोव्हेंबरमध्ये परिस्थिती बदलत हा ०.२६ या सकारात्मक पातळीवर आला होता. सोमवारी सरकारने सांगितल्याप्रमाणे,भारताच्या घाऊक महागाई दरावर आधारित (WPI) मार्च २०२४ मध्ये ०.५३ टक्क्याने वाढ झाल्याचे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
 
मागील वर्षाच्या मार्चमध्ये ही वाढ ०.२० टक्के होती. तसेच मार्च २०२३ मध्ये अन्नातील महागाई ५.४२ टक्के होती जी मार्च २०२४ मध्ये ६.८८ टक्के झाली आहे. भाज्यांमध्येही महागाई दर २.३९ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या मार्च २०२३ मध्ये हा दर २.३९ टक्क्यांनी कमी होता.
 
याशिवाय क्रूड (कच्च्या) तेलाच्या महागाईतदेखील १०.२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२३ मध्ये क्रूड तेलाचे भाव २३.५३ टक्क्यांनी घटले होते. मात्र भाज्यांच्या दरात दिलासा मिळाल्याने मार्चमध्ये किरकोळ महागाई दरात घसरण होत ४.८५ टक्क्यांपर्यंत महागाई दर पोहोचला होता.
 
मार्चमध्ये अन्नातील महागाई दर ८.५२ टक्के होता. फेब्रुवारी महिन्यातील तुलनेत हा घटला होता कारण फेब्रुवारी महिन्यात महागाई दर ८.६६ टक्के होता.
 
Powered By Sangraha 9.0