व्यवसाय सुरु करायचा आहे मग २० लाख घ्या!

15 Apr 2024 18:48:53

Nikhil Kamath
 

मुंबई: नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी झेरोडा (Zerodha) कंपनीचे निखिल कामत यांनी आगळीवेगळी योजना सुरू केली आहे. या योजनेचा नाव त्यांनी 'WTFund' असे ठेवले आहे. २५ वर्षाखालील तरूणांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
 
ज्यांच्याकडे व्यवसायाची ऊर्मी आहे, शिक्षण व कौशल्य व जिगर आहे अशा तरूणांसाठी ही योजना त्यांनी सुरू केली आहे.पात्र उमेदवारांला या कार्यक्रमाअंतर्गत २ लाखांचे अनुदान मिळणार आहे. याशिवाय इतर फायदेही उभरत्या पात्र उमेदवारांना मिळू शकतात.पैशाव्यतिरिक्त मानसिक पाठिंबा, आधार, कौशल्य बांधणी, नवे व्यासपीठ व मानवी संसाधने यांचाही फायदा त्या संबंधित उमेदवारांना मिळणार आहे.
 
या योजनेत २० लाखांच्या देणगीचे भविष्यात इक्विटीत रूपांतर होऊ शकते. या व्यतिरिक्त आवश्यक तो तांत्रिक व कौशल्य पाठिंबा यामध्ये मिळतानाच गो टू मार्केट (Go to Market) इको सिस्टीम मध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे.
 
याविषयी बोलताना झेरोडाचे निखिल कामत म्हणाले, ' आपल्या संस्कृतीत ज्येष्ठांना महत्व आहे त्यांचा आदर करूनच नवीन तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही याचे प्रयोजन केले आहे. आमच्या लहानपणीचा आणि आताचा भारत यामध्ये आम्हाला आज पाहताना फरक जाणवतो. पूर्वी स्थिर नोकरीला प्राधान्य होते आता मात्र उद्योजकतेकडे तरुणांचा कल वाढत आहे. WTF मध्ये तरूण उद्योजकांची संस्कृती उभे करून एक सपोर्ट सिस्टीम उभी करण्यास आम्ही उत्सुक आहोत.यासाठी आम्ही ही योजना काढली असल्याने आता भविष्यात काय होते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल ' आसे म्हणाले आहेत.
 
या कार्यक्रमाची मुख्य अट - २५ वर्ष अथवा त्याहून कमी वय असलेल्या तरूणांसाठी निधी व मार्गदर्शन केले जाईल.
 
कसा अर्ज करावा?
 
प्रथम WTF या वेबसाईटवर जावे. (www.allthingswtf.com/ wtfund)
 
त्यानंतर आपली संकल्पना सांगून त्याबद्दल स्पष्ट करावे
 
त्यानंतर अनुदानासाठी निवड झाल्यास कंपनीकडून कळवण्यात येईल
 
त्यानंतर विस्तारीत मुलाखत होणार
 
व शेवटची फेरी ही त्यात पुन्हा फेरनिवड करून कोणाला अनुदान द्यावे यासाठी अंतिम उमेदवारांची निवड होईल
 
Powered By Sangraha 9.0