सांगली : लोकसभा निवडणूकांना थोडेच दिवस शिल्लक असताना सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील रस्सीखेच कायम आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा उबाठा गटाला गेल्याने काँग्रेस पक्षातील काही नेते नाराज आहे. या जागेबाबत पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. मात्र, या जागेबाबत अद्याप निर्णय होत नसल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचलंत का? - जळगावात ठाकरे-पवारांना शिंदेंचा मोठा दणका!
विशाल पाटील सांगलीतून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. परंतू, या जागेवर उबाठा गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता विशाल पाटील १६ एप्रिलपर्यंत काँग्रेस आपला निर्णय बदलणार का, याची वाट पाहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्यथा ते सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, विशाल पाटील मंगळवारी काँग्रेस पक्षाचा आणि अपक्ष असे दोन अर्ज भरणार असल्याची माहिती पुढे आली आहे.