सोने चांदी अजून महागच सोने ७३१५० व चांदी ८३८४० किलो

15 Apr 2024 12:57:04

Gold
 
 
मुंबई: आंतरराष्ट्रीय दबावाने बाजारातील सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन महागाई दरात झालेली वाढ, मध्यपूर्वेतील दबाव, इस्त्राईल व इराण यांच्यातील वाद व पुरवठ्याच्या तुलनेत मागणीत वाढ यामुळे क्रूड (Crude ) तेलाच्या बरोबरच सोने व चांदीच्या भावात वाढ झाली आहे. दुपारी युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली होती. युएस स्पॉट दरात २३५३ हून अधिक वाढ झाली आहे.
 
भारतात एमसीएक्सवर सोन्याचे दर ०.०६ टक्क्यांनी वाढत ७१८९९ पातळीवर पोहोचले आहेत व चांदीच्या दरात १.२४ टक्क्यांनी वाढत ८३८४० पातळीवर पोहोचले आहेत.
 
देशातील एकूणच सराफा बाजारात सोन्याच्या व चांदीच्या दरात वाढ झाली आहे. भारतात प्रति ग्रॅम दरात ५५ रूपयांनी वाढ झाली आहे. भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या दरात १० ग्रॅम दरात ५५० रूपयांनी वाढ होत सोने ६७०५० रुपयांवर पोहोचले आहेत. तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६०० रूपयांनी वाढ झाली असून सोने ७३१५० रूपयांवर पोहोचले आहे.१८ कॅरेट सोन्याच्या दरात ४५० रुपयांनी वाढ होत सोने ५४८६० रुपयांवर पोहोचले आहे.
 
मुंबईत सोन्याचे दर प्रति ग्रॅम मध्ये सरासरी ५५ रुपयांनी वाढले आहेत. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात ५५० रुपयांनी वाढ होत सोने ६७०५० रूपयांपर्यंत वाढले आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ६०० रुपयांनी वाढ झाली असून ७३१५० रुपयांवर सोने पोहोचले आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात ४५० रूपयांनी वाढ होत सोने ५४८६० पर्यंत पोहोचले आहे.
 
मुंबईत चांदीचे दर १ किलोमागे ५०० रुपयांनी वाढत ८६००० रूपयांवर पोहोचले आहे. गेल्या १० दिवसात चांदीच्या दरात सरासरी ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदीचे दर ८६ रुपयांवर गेले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0