नांगरमोडाच्या स्वयंसेवकांकडून डॉ. आंबेडकर जयंती उत्साहपूर्वक साजरी

15 Apr 2024 16:59:26

Dr. Ambedkar Jayanti, Nangarmoda

मुंबई (प्रतिनिधी) :
नांगरमोडा, जव्हार येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Ambedkar Jayanti RSS Javhar) दत्तगुरु संयुक्त शाखेत रविवार, दि. १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून वयम चळवळीचे अध्यक्ष विनायकजी थाळकर उपस्थित होते. न्याहाळे उपखंडातील स्वयंसेवक व इतर नागरिकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हे वाचलंत का? : रामनवमीनिमित्त दर्शन व्यवस्थेत मंदिर न्यासाकडून मोठे बदल

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर वक्त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि समाजासाठी त्यांचे योगदान' या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी आणि विचारांचे पालन करून समाजात समानता आणि बंधुता निर्माण करण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या विचारांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.


Powered By Sangraha 9.0